बीड मधील आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला ॲड माधव जाधव यांनी केली 25 हजार रुपयांची मदत….
बीड मधील आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला ॲड माधव जाधव यांनी केली 25 हजार रुपयांची मदत….
जातीपातीच्या भिंती तोडून ॲड माधव जाधव यांनी पीडित नागरगोजे कुटुंबाला दिला आधार….
केज: देवगाव ता.केज जिल्हा बीड येथील रहिवासी असणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी बीड येथील बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. 18 वर्ष शिक्षकाची नोकरी मोफत केल्यानंतर सुद्धा त्यांना पगार चालू न झाल्यामुळे धनंजय नागरगोजे यांनी तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक वर पोस्ट टाकून स्वतःची जीवन यात्रा संपवली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी व त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ही सहा महिन्याची गरोदर आहे.घरामध्ये वृद्ध आई-वडील आहेत.अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये व संकटामध्ये आहे.
ॲड माधव जाधव यांनी देवगाव ता.केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील भानुदासराव नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत 25000 रुपयाचा धनादेश देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत केली.यावेळी ॲड माधव जाधव यांचे सोबत ॲड.रणजीत खोडसे, श्री देविदास नागरगोजे, सुनील घोळवे,शरद मुंडे,अशोक नागरगोजे, सदाशिव मुंडे, ॲड. एस. एल. गलांडे ,ॲड. एस. व्ही. गलांडे ,ॲड. एम. एल. भोसले ,ॲड. पी. डी. इतापे,, ॲड. कोनैण काझी, सुग्रीव आप्पा अंबाड व ग्रामस्थ ऊपस्थीत होते.
