ताज्या घडामोडी

प्रा.गोविंद जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार सन्मान

प्रा.गोविंद जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार सन्मान

घाटनांदूर (प्रतिनिधी)

राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा’आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रा गोविंद जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे वितरण दिनांक २३ मार्च २०२५ रविवार रोजी प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने व सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या हस्ते मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे.
राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना प्रतिवर्षी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते
त्यात आदर्श शिक्षक, समाजरक्षक, उद्योजक, पत्रकार आणि समाजसेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तींना गौरविण्यात येते यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रा गोविंद राजाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोपानराव ढगे , उपाध्यक्ष जी.डी. बनसोडे तसेच सचिव मिलिंद ढगे यांनी दिली आहे. आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल गोविंद जाधव यांचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव सिरसाठ,सरपंच महेश आप्पा गारठे,उपसरपंच दत्ता काका जाधव,माजी सरपंच ज्ञानोबा बप्पा जाधव,माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख,डॉ डी वाय भारती, बाळासाहेब अरसुडे,प्रदीप कांबळे,गजानन मंदे,प्रकाश माले,सुरेश मिसाळ,मयूर जाधव,प्रा.मोदी,प्रा घुले,प्रा गंगने, प्रा सिरसाट,प्रा घुन्नर,प्रयोगशाळा सहाय्यक महादेव दौंड,विजय कांबळे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!