दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या होल्हार समाजाच्या मुलास बेदम मारहाण झाल्याचा व्हीडीओ व्हायरल, अंबाजोगाई तालुक्यात खळबळ
दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या होल्हार समाजाच्या मुलास बेदम मारहाण झाल्याचा व्हीडीओ व्हायरल, अंबाजोगाई तालुक्यात खळबळ
आंबाजोगाई (प्रतिनिधी)
आंबाजोगाई तालुक्यातील द
स्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या होल्हार समाजाच्या मुलास बेदम मारहाण झाल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्या मूळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणा नंतर बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मारहाणीचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याची नाचक्की सर्व राज्यभरात होते आहे.
असाच एक प्रकार आंबजोगाई तालुक्यातून समोर आला असुन शहरानजिकच असलेल्या तालुक्यातील दस्तगीर वाडी येथील राहिवासी असलेल्या कृष्णा साळे या होल्हार समाजाच्या अल्पवयीन मुलास अंबाजोगाई शहरातील मुकदराज मंदिर रोड वर हत्तीखाना परिसरात काही गुंड मूले रिंगण करून बेदम मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली. या संदर्भात बीड जिल्हा पोलीस आधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत आरोपीचा शोध सुरु केला आसून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान ऑल इंडिया दलित पँथर सनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीवर अट्रॅसिटी ऍक्ट सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आसून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.
