तळेगांव शिवारात विहीरीच्या जिलेटीन स्पोटात कामगाराचा मृत्यु दोघाजनांची प्रकृती चिंताजनक
तळेगांव शिवारात विहीरीच्या जिलेटीन स्पोटात कामगाराचा मृत्यु
दोघाजनांची प्रकृती चिंताजनक, तर एकावर स्वा.रा.ति.मध्ये उपचार सुरू
गंभीर जखमींना लातूर च्या रूग्णालयात हलवले
———————————————–

अंबाजोगाइै (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेगांव घाट शिवारात एका शेतकर्याच्या शेतामध्ये वैयक्तीक जलसिंचन विहीरीचे काम सुरू होते या कामावर ब्लास्टींग करतांना जिलेटींगचा स्पोट झाल्याने एक कामगार 50 फुट विहीरीच्या बाहेर येवून परत विहीरीत पडला याचा जागीच मृत्यु झाला तर अन्य तीघेजन जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वा.रा.ति. रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवार सकाळी 11.30 वा. घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील तळेगांव घाट तांडा शिवारात उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाची वैयक्तीक जलसिंचन विहीर मंजुर झाली होती या विहीरीचे काम सुरू असताना मंगळवारी या विहीरीमध्ये जिलेटींगचे स्फोट घेण्यात आले. उर्वरीत राहीलेल्या कामाचे कामकाज सुरू असतांना सकाळी 11.30 च्या सुमारास विहीरीतील जिलेटींगचा स्पोट झाल्याने धनराज अनंत दहीफळे रा. खोडवा सावरगांव, ता. परळी या मजुराला विहीरीच्या बाहेर 10 फुट उंच उडून परत विहीरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला तर पिंटू विठ्ठल दहीफळे, जीवन हरिश्चंद्र दहीफळे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचारासाठी आनले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना लातूरच्या खाजगी रूग्णालयात रेफर करण्याची विनंती केली तर दुसरा भारत तुकाराम पवार रा. तळेगांव हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची माहिती तालुक्यात वार्यासारखी पसरल्यानंतर प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
*घटना स्थळावर अतिरिक्त पोलीस अधिक्षकांची भेट*
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक चोरमले, बर्दापूर पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. राजकुमार ससाने, बिट अमलदार चेवले यांनी घटनास्थळाला भेट घेवून जखमींना तात्काळ रूग्णालयात हलविले.
उत्तम आडे यांच्या वैयक्तीक विहीरीच्या खोदकामाचे काम खोडवा सावरगांव येथील हरिश्चंद्र दहीफळे व गोविंद दहीफळे यांच्या ब्लास्टींगच्या ट्रॅक्टरला काम देण्यात आले होते. हे काम करत असतांना सदरील अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनिनी सांगीतले.
