नजरेने टिपलेले “काळे – धंदे” हे बॅनर पाहता पाहता सोशल मीडिया मूळे महाराष्ट्रच नव्हे तर राज्याच्या बाहेरहीं व्हायरल
नजरेने टिपलेले “काळे – धंदे” हे बॅनर पाहता पाहता सोशल मीडिया मूळे महाराष्ट्रच नव्हे तर राज्याच्या बाहेरहीं व्हायरल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मॉर्निग वॉकला जाताना सहजच नजरेने टिपलेले “काळे – धंदे” हे बॅनर पाहता पाहता सोशल मीडिया मूळे महाराष्ट्रच नव्हे तर राज्याच्या बाहेर हीं व्हायरल झालं आणि या नावाची चर्चा सर्वत्र चावीने होऊ लागली.
कोणाचे काय आडनाव असतील आणि यातून काय विनोद निर्माण होईल हे सांगणेच कठीण आणि असाच एक विनोद
“काळे – धंदे” या दोन आडनावा मधून निर्माण झाला आणि तो सर्व दूर वाऱ्या सारखा पसरला.
मागील आठवड्यात नेहमी प्रमाणे मी सकाळी सकाळी संत भगवान बाबा चौका कडे मॉर्निग वॉकिंगला जात असताना माझी नजर योगेश्वरी विद्यालया समोरील एल आय सी रोड कडे पडली, त्या रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा संपन्न होणार असल्याने रोड च्या दर्शनी भागावार एक स्वागत कमान उभारण्यात आली होती आणि या स्वागत कमानी वर ज्या दोन परिवाराचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्यातील एकाचे आडनाव “काळे” तर दुसऱ्याचे आडनाव “धंदे” आसल्याने स्वागत कमानी वर लिहण्यात आलेले आहे “काळे-धंदे” परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
आणि हेच बॅनर माझ्या नजरेने मी मोबाईल मधे कॅच करून एक विनोद या उद्देशाने सहजच सोशल मीडिया वर टाकले आणि पाहता पाहता हे काळे-धंदे, महाराष्ट्र नव्हे तर बाहेर सुद्धा व्हायरल झाले आणि याची चवीने चर्चा आज हीं होताना दिसतेय.
