ताज्या घडामोडी

विघ्नहर्ता इंटरप्रायजेस फर्मचे भागीदार सुशील रांदड व रोहन मुंदडा यांना  तत्कालीन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी दिलेल्या बनावट भाडेपत्रा आधारे सुरु आहे अतिक्रमन, राहिवाश्यांचा आंदोलनाचा इशारा 

विघ्नहर्ता इंटरप्रायजेस फर्मचे भागीदार सुशील रांदड व रोहन मुंदडा यांना  तत्कालीन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी दिलेल्या बनावट भाडेपत्रा आधारे सुरु आहे अतिक्रमन, राहिवाश्यांचा आंदोलनाचा इशारा 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
    अंबाजोगाई येथील सर्व्हे क्र. १७०/१ मधील दत्त नगर कॉलनीतील मंजुर ले आऊट मधील ४१०० चौ. मिटर ओपन स्पेस वर अंबाजोगाई येथील विघ्नहर्ता इंटरप्रायजेस या फर्म चे भागीदार सुशील राधाकिशन रांदड व रोहन भगवानदास मुंदडा या व्यापारी लोकाना नगर परिषदचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्याशी संगणमत करत खोटे बनावट भाडेपत्राचा दस्त तयार करून बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करत आहे या अतिक्रमणाच्या विरोधात श्री दत्तनगर कॉलनीतील रहिवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सर्व्हे क्र. १७०/१ मध्ये अंबाजोगाई नगर परिषद यांन ले. आऊट मंजूर करुन घेतला व विविध साईझचे प्लॉट पाडून काही  भूखंड नगर परिषद कर्मचारी यांना वितरीत केले व उर्वरित भूखंड लिलावाद्वारे नागरिकांना विक्री केले आहेत. नगरपरिषद अंबाजोगाई यांनी लाखो रुपये खर्चुन दत्त नगर कॉलनीच्या ओपन स्पेस मधील ९६३ चौ. मीटर जागेत अनाधिकृतपणे जलतरणचे बांधकाम केले असून, सदरचे जलतरणचे बांधकाम नगररचनाकार बीड यांनी सुधारीत अभिव्यास क्र. ८१ दिनांक १८/०८/२००८ प्रमाणे रद्द केलेले आहे. तरीही नगर परिषदाचे जलतरण चालविण्यासाठी धनदांडग्या लोकांना अनाधिकृतपणे भाड्याने दिले आहे. मात्र या जलतरणांचा दुरुपयोग करत असून सदरचे लोक कॉलनीत येवून पत्ते, जुगार खेळणे दारुच्या पार्टी करणे, कॉलनीतील मुख्य रस्त्यावर वाहने लावून जाणाऱ्या येणाऱ्या रहिवाशी लोकांना अडथळा करीत आहेत. कॉलनीतील महिलांसमोर नागवे उघडे वेवून महिलांना त्रास देत आहेत यामुळे महिलांना हा त्रास सहन करावा लागतो आहे.
   यावर न थांबता जलतरण चालविणारे व्यापारी लोग दत्त नगर कॉलनीतील ओपन स्पेस मधील उटावतील ३१३७ चौ. मीटर खुल्या जागेवर वाईट नजर ठेवून नगर परिषद अंबाजोगाईचे तत्कालीन मुख्याधिकारी यांचेशी संगणमत करुन बोगस भाडेपत्र करुन घेवून सदर खुल्ला जागेत व्यवसायीक स्वरुपाचे बांधकाम करण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.
नगर परिषद अंबाजोगाई यांना मंजूर ले आऊट मधील ओपन स्पेसची जागा रहीवाशीयांच्या पूर्व परवानगीशिवाय इतराना भाड्याने देता येत नाही. तसेच न.प. यांना ओपन स्पेस ची जागा केवळ सार्वजनिक वापरसाठी ठेवणे बंधनकारक असतांना सदरची जागा हीं विघ्नहर्ता इंटरप्रायजेस या फर्म चे भागीदार सुशील राधाकिशन रांदड व रोहन भगवानदास मुंदडा या खाजगी व्यापारी लोकांना व्यवसायीक उद्देशा करिता देता येत नसताना बेकायदेशीररित्या भाड्याने दिलेली आहे.
    हे खाजगी व्यापारी लोक राजकीय बळाचा वापर करुन कॉलनीतील ओपन स्पेस च्या जागेवर अतिक्रमण करावयाच्या उद्देशाने जेसीबी च्या सहाय्याने पायाचे खोदकाम केले असून तसेच ओपन स्पेस मधील पुर्वीचे झाडे, बगिवाची रस्ते उखडून टाकू लागले म्हणून तेथील रहिवाशी यांनी दिनांक त्यांना अडविले व त्या बाबत न.प. अंबाजोगाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोंगे मॅडम यांच्याकडे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रितसर निवेदन दिलेले असून रहिवाशी लोकांनी वरिल लोकांच्या विरुद्ध मा. दिवाणी न्यायालय व अंबाजोगाई येथे नियमित दिवाणी दावा क्र. ९५/२०२५ प्रमाणे घोषणा व चिरकाल मनाई हुकूम मिळणे बाबतचा दावा दिलेला आहे. त्या प्रमाणे मा. कोर्टाने वरील लोकांना कारणे दाखवा नोटीस काढलेला आहे. मात्र दत्त नगर कॉलनीतील ओपन स्पेस मध्ये होणारे अतिक्रमणले तात्काळ बंद केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री दत्तनगर कॉलनीतील रहिवाशांनी दिला
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!