ताज्या घडामोडी

नागपुरात माथे भडकवणारे कोण? दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम

नागपुरात माथे भडकवणारे कोण? दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम

नागपूर (प्रतिनिधी)

    नागपूर शहरात जी दंगल उसळली त्याचा जो घटना क्रम समोर आला आहे तो या पद्धतीने

   औरंगजेबाची कंबर हटवण्याच्या मुद्या वरून सकाळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

 –दुपारी एक वाजता विश्व हींदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.

–दुपारी दोन वाजता : औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.

– दुपारी चारपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते

– विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करुन बोलावले, परंतु, पोर्टलच्या पत्रकारांशिवाय कुणीही तिकडे फिरकले नाही.

– औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले.

 –रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली.

– रात्री साडेसात वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.

– रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.

– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

– दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.

दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.

– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल उसळली.

– रात्री नऊ वाजतापासून पोलिसांनी ‘कोम्बींग ऑपरेशन’ राबवून धरपकड सुरु केली.

– रात्री १० वाजतापर्यंत २० जण ताब्यात घेतले आणि धरपकड सुरुच आहे.

– एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी, त्यांच्यावर उपचार सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!