तिरुपती ट्रॅव्हल्स ने पुणे ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची डिकीत ठेवलेली 10 तोळे सोने असलेली बॅग गायब
तिरुपती ट्रॅव्हल्स ने पुणे ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची डिकीत ठेवलेली 10 तोळे सोने असलेली बॅग गायब
आंबजोगाई (प्रतिनिधी)
तिरुपती ट्रॅव्हल्स ने पुणे ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या अंबिका स्वीट होमच्या मालकाच्या मातोश्रीची डिकीत ठेवलेली 10 तोळे सोने असलेली बॅग गायब झाल्याने ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या सुरक्षिते विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
या विषयी प्राप्त माहिती आशी की,
मूळ राजस्थान येथील राहिवासी असलेल्या व आंबजोगाई येथे मुलास भेटन्यास येण्या साठी माया लक्ष्मणजी राकावत रा जो्थपूर राणी या सोमवारी रात्री पुणे ते आंबाजोगाई चालणाऱ्या तिरुपती ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 04 LQ 9845 या ट्रॅव्हल्स मध्ये बसल्या.
ट्रॅव्हल्स मध्ये बसताना त्यांनी किन्नर असलेला मुलगा ओमकार गुट्टे याच्या सहाय्याने त्यांच्या 2 बॅगा ट्रॅव्हल्स च्या डिकीत ठेवल्या. आज सकाळी ज्या वेळी ट्रॅव्हल्स आंबजोगाई मध्ये आली आणि माया राकावत या ट्रॅव्हल्स मधून उतरुण किन्नर च्या मदतीने आपल्या बॅग काढू लागल्या असता त्यांना त्यांच्या 2 बॅग पैकी 1 बॅग गायब दिसली. दरम्यान गायब झालेल्या बॅग मधे 10 तोळे सोने असल्याने त्यांची एकच आरडा ओरड केला.
त्या नंतर त्यांना घेऊन जाण्यास आलेल्या त्यांच्या मुलाने व नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीची पाहणी केली असता या डिकीत बसवण्यात आलेले सिसिटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा चालक पिराजी ब्रिगणे यास
अधिक चौकशी केली असता त्याने गाडी पुण्याहून निघून फक्त केजला थांबली व त्या ठिकाणी 7 प्रवाशी उतरल्याचे सांगितले.
पोलिसांनी ट्रॅव्हल्स मालक नागरगोजे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकून टाकली. या प्रकरणी आंबजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आसून डिकीत ठेवलेली 10 तोळे सोने असलेली बॅग ट्रॅव्हल्स चालकाच्या बेजबादार पणा मूळे गायब झाल्याने ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या सुरक्षिते विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
