“सिरसाळा भूषण पुरस्कार 2025” ची घोषणा, 22 मार्च रोजी होणार वितरण शंकर घोडके, मल्हारराव डोणगांवकर, शाम सरवदे, अशोक गलांडे,, राहुल बुरंगे, तुकाराम देवकर, डॉ. उषा माने, प्रकाश सुरवसे पुरस्काराचे मानकरी
“सिरसाळा भूषण पुरस्कार 2025” ची घोषणा, 22 मार्च रोजी
खा. बजरंगबाप्पा सोनवणे, सिने अभिनेत्री निशिगंधा वाड व ज्यू. मकरंद अनासपुरे होणार वितरण
शंकर घोडके, मल्हारराव डोणगांवकर, शाम सरवदे, अशोक गलांडे,, राहुल बुरंगे, तुकाराम देवकर, डॉ. उषा माने, प्रकाश सुरवसे पुरस्काराचे मानकरी
सिरसाळा (प्रतिनिधी):-
सिरसाळा येथील जनकल्याण शैक्षणिक सेवाभावी संस्था व यशराज पब्लिक स्कुलच्या वतीने देण्यात येणाऱ्या “सिरसाळा भूषण पुरस्कार 2025” या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून या पुरस्काराचे वितरण 22 मार्च रोजी खा. बजरंगबाप्पा सोनवणे, सिने अभिनेत्री निशिगंधा वाड व ज्यू. मकरंद अनासपुरे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष सिरसाळा भूषण पुरस्कार 2025 निवड समिती व श्री. जनक साहेबराव उबाळे अध्यक्ष, जनकल्याण बुउद्देशिय सेवाभावी संस्था वाघाळा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सिरसाळा व पंचक्रोशी मधे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी भरीवपणें कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन मागील काही वर्षा पासून जनकल्याण बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था वाघाळा व यशराज पब्लिक स्कुलच्या वतीने सामाजिक /शैक्षणिक /सांस्कृतिक /सेवा /आरोग्य सेवा /राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस “सिरसाळा भूषण पुरस्कार” देण्यात येत असून या वर्षी देण्यात येणाऱ्या “सिरसाळा भूषण पुरस्कार 2025” साठी संस्थेच्या वतीने प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या.
आलेल्या प्रवेशिका मधून समितीने
श्री शंकर ज्ञानोबा घोडके- राजकीय क्षेत्र
श्री मल्हारराव नाचण डोणगांवकर- (साहित्य क्षेत्र), श्री शाम लक्ष्मण सरवदे – (सामाजिक क्षेत्र ), श्री.अशोक हनुमंत गलांडे -(पत्रकारिता क्षेत्र), श्री राहुल रामदास बुरंगे- (कृषी क्षेत्र), डॉ. तुकाराम हरीचंद्र देवकर- (सांस्कृतिक), डॉ. उषा यशवंतराव माने- (महिला सामाजिक ), श्री. सुरवसे प्रकाश केरबा- शैक्षणिक क्षेत्र आदि पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड केली असून
या पुरस्काराचे वितरण 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता परळी तालुक्यातील सिरसाळा येथील यशराज पब्लिक स्कुल या ठिकाणी होणार आहे.
“सिरसाळा भूषण पुरस्कार 2025” या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. खा. बजरंगबाप्पा सोनवणे (खासदार, बीड लोकसभा मतदार संघ) हे असणार असून कार्यक्रमाचे उदघाटक मा. दिनेशजी चव्हाण साहेब उपसचिव ( इतर मागास बहुजन कल्याण मंत्रायल, मुंबई ) हे राहणार आहेत.
या सन्मान सोहळ्याचे विशेष आकर्षण. निशिगंधा वाड (सिने अभिनेत्री मुंबई) व ज्यू. मकरंद अनासपुरे हे असणार असून या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. जनक साहेबराव उबाळे अध्यक्ष जनकल्याण बुउद्देशिय सेवाभावी संस्था वाघाळा व अध्यक्ष सिरसाळा भूषण पुरस्कार 2025 निवड समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे
