व्याजाच्या पैशा साठी युवकाचे अपहरण बेदम मारहाण करून व्याजा सहीत पैसे दिले नाही तर फासावर लटकावण्याची दिली धमकी, 7 जनाविरुद्ध गुन्हा दाखल
व्याजाच्या पैशा साठी युवकाचे अपहरण बेदम मारहाण करून व्याजा सहीत पैसे दिले नाही तर फासावर लटकावण्याची दिली धमकी, 7 जनाविरुद्ध गुन्हा दाखल
अंबाजोगाई :
व्याजाच्या पैशांसाठी युवकांचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आसून शहरात व्याजी व्यवहारी करून युवकांना गोत्यात आणणारे टोलके सक्रिय असल्याने या टोलक्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे.
या प्रकरणी आंबजोगाई येथील हनुमान नगर येथील राहिवासी आसलेला जखमी ओंकार माने ( वय 22) यांनी 14 मार्च घडलेल्या घटने विषयी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने मित्राकडून वीस हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी रक्कम शिल्लक नसल्याची अडचण त्याने अनिकेत औताडे यास बोलून दाखवली. तेंव्हा अनिकेतने माझा भाऊ जयपाल उर्फ महादू औताडे हा व्याजाने पैसे देतो, तू तुझ्यासाठी २० हजार आणि माझ्यासाठी ५० हजार अशी रक्कम घे, मी माझी रक्कम आणि व्याज फेडतो असे ओंकारला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन ओंकारने महादू कडून याच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले. मात्र, सात टक्के दराने घेतलेल्या या कर्जावर सतत स्वतःचे आणि अनिकेतचे व्याज भरावे लागत असल्याने ओंकार आर्थिक अडचणीत सापडला. यापुढे तुझे पैसे भरणे शक्य रक्कम घे, मी माझी रक्कम आणि व्याज फेडतो असे ओंकारला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन ओंकारने महादू कडून याच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले. मात्र, सात टक्के दराने घेतलेल्या या कर्जावर सतत स्वतःचे आणि अनिकेतचे व्याज भरावे लागत असल्याने ओंकार आर्थिक अडचणीत सापडला. यापुढे तुझे पैसे भरणे शक्य नसल्याचे त्याने अनिकेत याला सांगितले असता, त्याने आपल्या साथीदारांसह ओंकारला धमकावत जबरदस्तीने कारमधून उचलून नेले. त्यानंतर ओंकारला सेलू आंबा येथील एका ढाब्याच्या मागील शेतात नेण्यात आले. तेथे महादु औताडे व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि फायबर पाईपने ओंकारला बेदम मारहाण केली. तसेच, “व्याजाचे पैसे भर नाहीतर तुला फासावर लटकवू” अशी धमकी दिली. यावेळी, एका स्थानिक व्यक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यालाही धमकावले.
दरम्यान, ओंकारच्या मित्राने घटनेची माहिती अजिंक्य कदम, गोविंद हाके, आदेश पटाईत यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना समजावून सांगत ओंकारला सोडवले. मात्र, नंतर भगवानबाबा चौकात पुन्हा आरोपींनी ओंकार व त्याच्या भावाला, “जर पोलिसात तक्रार दिली तर जिवे मारू व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू” अशी धमकी दिली. सदर फिर्यादीवरून अनिकेत औताडे, जयपाल औताडे, धीरज बनसोडे, नूर, बापू इंगळे, अभिमन्यू औताडे व सिद्दीक या सात जणांविरोधात अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे.
शहरात व्याजी व्यवहारी करून युवकांना गोत्यात आणणारे टोलके सक्रिय
आंबजोगाई शहरात युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या सोबत आर्थिक व्यवहार करून त्याला जबरदस्तीने व्याजाने पैसे देऊन आणि वेळेत परत न आल्यास त्याला गोत्यात आणणारे टोलके सक्रिय असून पोलीस यंत्रनेने आशा टोलक्यावर करडी नजर ठेऊन कार्यवाही करायला हवी अशी प्रतिक्रिया नागरीकातून व्यक्त होत आहे.
