ताज्या घडामोडी

दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू; एकाळा 15 दिवसाची चिमुकली तर दुसऱ्याची बायको गर्भवती, सर्वत्र हळहळ 

दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू; एकाळा 15 दिवसाची चिमुकली तर दुसऱ्याची बायको गर्भवती, सर्वत्र हळहळ 

पुणे (प्रतिनिधी )

   वाई येथील पसरणी घाटात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कोकणात फिरायला गेलेल्या लोणी काळभोर येथील दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला असून एका मित्राला फक्त 15 दिवसाची चिमुकली तर दुसऱ्या मित्राची पत्नी पहिल्यांदा गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ होत आहे.

  पसरणी घाट उतरत असताना कार शंभर फूट खोल दरीत गेली यामध्ये चार पर्यटक प्रवास करत होते. यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आसून अक्षय काळभोर , सौरभ काळभोर अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, बजरंग काळभोर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघे मित्र हे लोणी काळभोर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. होळीच्या सणाला सायंकाळी घरी परत येत होते, त्यावेळी हे दुर्दैवी घटना घडली आहे.

होळीच्या सणाला चालले होते घरी

पसरणी घाटात पाचगणी-वाई रस्त्यावर बुवासाहेब मंदिराजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर घाट उताराचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी दोनशे फूट खोल दरीत कोसळली. संध्याकाळच्या सुमारास या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सह्याद्री आणि शिवेंद्रराजे या दोन रेस्क्यू टीमच्या मदतीने चारही जखमींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता दोघांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भागीदारीत सुरु केला होता व्यवसाय

सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि अवघ्या 15 दिवसांची मुलगी आहे. तर अक्षयचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. सौरभ आणि अक्षय हे बिझनेस पार्टनर असून भागीदारीत त्यांनी एक जिम सुरू केली होती. दोन मित्रांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!