ताज्या घडामोडी

पोलीस ठाण्यासमोरच भिकाऱ्याला  दगडाने ठेचून संपवलं, लातूर मध्ये  खळबळ

पोलीस ठाण्यासमोरच भिकाऱ्याला  दगडाने ठेचून संपवलं, लातूर मध्ये  खळबळ

लातूर (प्रतिनिधी)

    लातूरमध्ये पोलीस ठाण्याबाहेरच एका भिकाऱ्याची रात्री दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले असून शहरात खळबळ उडाली आहे.

   राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यातच आता लातूर मध्ये मध्यवरती ठिकाणी एका भिकाऱ्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

चहावाल्याने पाहिलं अन्…

लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पुढेच एका भिकाऱ्याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या अगदी पुढे असलेल्या फुटपाथवर हा अज्ञात भिकारी रात्री झोपला होता. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका चहावाल्याच्या सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांचे याकडे लक्ष गेलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलीस ठाण्याबाहेर घटना, पोलिसांच्या लक्षात का आली नाही?

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. मध्यरात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पुढेच झोपलेल्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्यामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेबाबत सकाळ उजडेपर्यंत शिवाजीनगर पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून मारेकऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली आहे. या घटनेमुळे मात्र लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!