Sunday, June 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

सर्वात मोठी बातमी  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिक मध्ये पाहिल्याचा प्रत्यक्ष दर्षीचा दावा

  सर्वात मोठी बातमी 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिक मध्ये पाहिल्याचा प्रत्यक्ष दर्षीचा दावा

नाशिक (प्रतिनिधी )

    मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरनात मागील तीन महिन्यांपासून बीड पोलिसांसह सीआयडीला गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आसताना आता कृष्णा आंधळेच्या लोकेशनबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आसून कृष्णा आंधळे यास आज नाशिक मधे पाहिले असल्याचा दावा काही प्रत्यक्ष दर्शिनी केला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलीस परिसरात दाखल झाले आहेत.

नागरिकांच्या म्हणण्याणुसार, एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. दत्त मंदिराकडे जात असताना एका बाजूला दोघे उभे होते. त्यापैकी एकाने मास्क खाली घेताच तो कृष्णा आंधळे असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी तात्काळ पोलिसांना फोन केल्याचे त्याने म्हटले आहे. या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत शोध सुरु केला आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार झाला आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले मात्र कृष्णा आंधळेने सर्वांनाच गुंगारा दिला आहे. तब्बल तीन महिने कृष्णा आंधळे न सापडल्याने त्याची हत्या झाली असावी, असाही दावा अनेकांनी केला होता. मात्र अशातच आता पहिल्यांदाच कृष्णाला पाहिले गेल्याचा दावा केल्याने तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!