ताज्या घडामोडी

सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर प्रयागराज मधून पोलिसांनी उचललं

सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर प्रयागराज मधून पोलिसांनी उचलल 

 

बीड (प्रतिनिधी)

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला  व पोलिसांना हवा असलेला आ सुरेश धस समर्थक सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे.

    सतीश भोसले आज स्वतः पोलिसांना शरण जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रयाग राजहून सतीश भोसले याला बीडकडे आणले जात आहे.

    सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र खोक्या चार दिवसांपासून फरार आहे. सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार होता.

खोक्या भाईचे कारनामे काय होते?

बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. सतीश भोसले हा राजकारणात सक्रिय आहे. त्याच्याकडे भाजपचे महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पदही होते. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याचा परिसरात दबदबा आहे.

झडतीमध्ये हाती लागल्या धक्कादायक गोष्टी

खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या घटनेनंतर आता पोलिसांकडून सतीश भोसलेविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वनविभाग आणि पोलीसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत.

घरात काय सापडलं?

पोलीस आणि वनविभागाने घेतलेल्या झाडाझडतीत खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!