परळी पुन्हा चर्चेत, मुलीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार
परळी पुन्हा चर्चेत, मुलीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार
परळी (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्ये नंतर परळी हे नाव राज्य व देश भरात गाजत असताना आणि नंतर राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना परळी शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली असून परळी मध्ये एका शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे महिला दिनी पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना बीड जिल्ह्यातील परळी मध्ये पुन्हा एकदा महिला अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आसून धीरज रामकिशन कांदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात परळी येथील संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमान अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकलं. मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला असे, फिर्यादीत सांगण्यात आले आहे. इतकंच नाही तर नराधमाने पीडित मुलीसोबत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये पोस्को कायद्यांतर्गत (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा 2012- POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
