ताज्या घडामोडी

बीडनंतर लातूर हादरलं, बार मधील भांडण रस्त्यावर, नग्न करून तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगडं घातली

बीडनंतर लातूर हादरलं, बार मधील भांडण रस्त्यावर, नग्न करून तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगडं घातली

दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी काढली वरात

लातूर (प्रतिनिधी)

   बीडनंतर आता लातूरमध्येही एका  तरुणाला 5 ते 7 जणांनी मिळून नग्न करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आसून राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांमध्ये वाद झाला, या वादानंतर तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसंच तरुणाचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली.

   हल्ल्यात जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.  मराठवाड्यातील बीड पाठोपाठ आता लातूरमध्येही भरदिवसा मुख्य रस्त्यावर तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला.

नग्न करून बेदम मारहाण

बारमध्ये हाणामारी झाल्यानंतर हा वाद रस्त्यावर आला. रस्त्यावर 5-7 जणांनी मिळून एका तरुणाला नग्न करून मारहाण केली. तसंच त्याच्या डोक्यात, अंगावर दगडंही मारण्यात आली. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी जखमी तरुणाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तरुणावर हल्ला करून आरोपी फरार झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती या पथकाने अवघ्या तीन तासात 4 आरोपी च्या मुसक्या अवळल्या.

दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी काढली वरात, अवघ्या तीन तासात पाच पैकी चार आरोपी जेरबंद

   चार तासापूर्वी लातूरमधील आंबेजोगाई रोडवर एका 35 वर्षी व्यक्तिला पाच लोकांनी बेदम मारहाण केली होती. रस्त्यावर झालेल्या महाराणीची व्हिडिओ काही वेळातच लातूरमध्ये व्हायरल झाले आणि घटनेनं लातूर शहर हादरलं होतं. यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच कारवाई करत या घटनेतील पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी मारलं होतं तिथूनच मारत त्यांची धिंड शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली.

दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मारहाण करुन दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतचर आरोपींनी ज्या ठिकाणी मारहाण केली, त्या ठिकाणाहून त्यांची धिंड काढत लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यावेळी बरोबर होतं. अवघ्या तीन तासात त्यांनी यातील चार आरोपींना जेरबंद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!