*रोटरी होकेशनल ऑवार्ड पुरस्काराने रमाकांत पाटील, रविंद्र देवरवाडे, विद्या रूद्राक्ष सन्मानित*
*रोटरी होकेशनल ऑवार्ड पुरस्काराने रमाकांत पाटील, रविंद्र देवरवाडे, विद्या रूद्राक्ष सन्मानित
अंबाजोगाई – रोटरी क्लब ऑफ सिटी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या व्यक्तींना
रोटरी होकेशनल ऑवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील प्रयोगशिल शेतकरी रविंद्र देवरवाडे तर महिला उद्योजक विद्या रूद्राक्ष यांना रोटरी होकेशन ऑवार्ड पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले.
प्रांतपाल सुरेश साबु, उपप्रांतपाल हेमंत रामढवे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील हे गेल्या 33 वर्षापासुन पत्रकारीतेत कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून समाजातील अनेक रखडलेल्या प्रश्नांना न्याय मिळाला.
प्रयोगशिल शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी गटशेती, महिला गटशेती व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून
शेतीमध्ये विविध प्रयोग केले. तर विद्या रूद्राक्ष यांनी महिला उद्योजक म्हणून शेतीतील पिकांपासुन प्रक्रिया उद्योग सुरू केले. तसेच वृक्ष लागवड व विविध घरगुती उद्योग यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना रोटरी होकेशनल ऑवार्ड या पुरस्काराने शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सन्मानपत्राचे वाचन गणेश लोमटे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोनवळकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
