ताज्या घडामोडी

केवळ दुकान जळाले नाही, अवघे आयुष्य उध्वस्त झाले ….! दोषीवर कार्यवाही करण्याच्या मागणी साठी गणेश राऊत यांची भावनिक साद 

केवळ दुकान जळाले नाही, अवघे आयुष्य उध्वस्त झाले ….! दोषीवर कार्यवाही करण्याच्या मागणी साठी गणेश राऊत यांची भावनिक साद 

आंबजोगाई
      20 जानेवारी च्या रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नप च्या व्यापारी संकुलात असलेल्या अविष्कार मेन्स वेअर या दुकानाला आग लागली आणि यात या दुकानात होते नव्हते सार काही जळून खाक झाले. या घटनेला जवळपास 2 महिने झाले मात्र दोषीवर कार्यवाही झालेली नाही त्यामुळे व्यतिथं झालेले दुकान मालक गणेश राऊत जे की रोटरी क्लब चे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावामिक साद घालत दोषीवर कार्यवाहि करण्याची मागणी केली आहे.
    सोशल मीडियावर गणेश राऊत यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की मी गणेश राऊत. छत्रपती शिवाजी चौक अंबाजोगाई येथील एका भाड्याच्या गाळ्यात ‘अविष्कार मेन्स वेअर’ चालवत होतो. उधार उसनवारी करून,  कर्ज काढून कपड्याचा व्यवसाय सुरू केला,  30 ते 35 लाख रुपये गुंतवणूक केली. मेहनत करून व्यवसाय नेटाने पुढे नेत होतो..
अचानक 20.1.2025 रोजी रात्री साधारण 11.30 वाजता फोन वाजला आणि समोरुन आवाज आला लवकर या तुमच्या दुकानाला आग लागली … आणि होत्याचे नव्हते झाले… मी  समजताच घटना स्थळी पोहोचलो मित्र मंडळी,  रोटरी परिवारातील स्नेही जमले सर्वांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला, नगर परिषद यंत्रणा  मदतीला आली….आग आटोक्यात आली…पण जे व्हायचे ते झालेच..! सर्व माल जळून खाक झाला होता… केवळ दुकान जळाले नाही..तर आयुष्यच  उध्वस्त झाल्यासारखे झाले… !!!
रोटरी परिवार आणि आप्तजण धावून आले म्हणून थोडा सावरलो… आयुष्याची सुरुवात नव्याने करण्याचे धाडस जमवले…
आपल्या आयुष्यात असे का घडले… कोणी केले?जाणीवपूर्वक कोणी केले नाही… पण कोणाच्या तरी निष्काळजीपणा आणि स्वयं आनंदाच्या धुंदीत हे घडले हे मात्र हळूहळू लक्षात आले.
ठीक आहे, ज्यांच्या कडून घडले, जाणीवपूर्वक नाही घडले… पण आपल्या चुकीमुळे हे झाले असे प्रांजळपणे सांगण्यास संबंधित पुढे आले नाहीत..उलट पुरावे कसे नाहीसे होतील…आपल्या यातील सहभागाची शक्यता कशी पुसून टाकता येईल यासाठी मात्र ते झटले…आणि त्याचीच वेदना अधिक होत आहे.
त्याचे झाले असे…
20 तारखेला आग लागली.
त्या रात्री फटाके वाजवल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात… सकाळी फटाक्याची वेष्टने दुकानाच्या समोर आणि मागे जेथे फटाके वाजवले गेले तेथे आढळून आले.
MSEB ने नुकताच रिपोर्ट दिला आहे की, आग विद्युत कारणामुळे लागली नाही. आता तर फटाके वाजवल्याचे आणि त्यामुळे आग लागल्याची शक्यता स्पष्ट करणारे CCTV फुटेज प्राप्त झालेत …
माझ्या दुकानाच्या समोर आणि मागील भागात रात्री कसल्यातरी यशाच्या धुंदीत  वाजवले गेलेले फटाकेच या आगीला कारणीभूत ठरलेत हे मात्र नक्की…
ज्यांनी हे केले आणि आता उघड होवू देत नाहीत ते पोलीस विभागातीलच कर्मचारी अधिकारी आणि त्यांचे मित्र आहेत.. म्हणून ही घटना पाहिजे तशा पद्धतीने दाबत आहेत… असा संशय येण्याचे कारण म्हणजे…
1. घटनेच्या तीन दिवसा नंतर पंचनामा करण्यात आला.
2. पंचनाम्यात रात्री फटाके वाजवल्याची आम्ही सांगून देखील नोंद घेतली नाही.
3. फटाके हेच आगीचे कारण असतांना पंचनामा गोलगोल शब्दात लिहिलेला असून त्यातून संशयीताकडे बोट जावू नये अशी काळजी घेतल्याचे जाणवते.
4. संशयित पोलीस विभागातील असल्याने पोलीस स्टेशन मधील प्रत्येक भेटीवेळी टाळाटाळ,  विलंब, उडवा उडवी ची उत्तरे.. जाऊ द्या,  सोडून द्या.. ज्यास्त नादी लागू नका… एक तर संशयित पोलीस विभागातील  आहेत, तुम्हाला जड जाईल,  आम्हालाही अड़चन नका करू! असे निमुटपणे ऐकावे लागायचे…
मी एक सामान्य, गरीब घरातला… पोलीस, कायदा याची माहिती नसलेला आणि फारसे कोणाचे पाठबळ नसलेला….
पण म्हणून मला न्याय नाही मिळणार?
माझे नुकसान झाले.. मी उध्वस्त झालो… अन करणारे मोकळे उजळ माथ्याने फिरणार?
कायद्याची पॉवर,  सत्ता,  बळ माझ्या बाजूने नाही…
घरी खाणारी दहा तोंडे आहेत,  मुलांचे शिक्षण,  आई चे आजारपण,  व्यवसाय पुन्हा उभा करून रोजी-रोटी टिकविणे हे सर्व मी कसे करू शकेल?
बाबा घरी येतांना काही तरी खायला आणतील या आशेने माझ्या वाटेवर डोळे लावून बसलेल्या माझ्या चिमुरड्यांच्या डोळ्याला मी कसा सामोरा जावू…?
औषधी आणली का म्हणून विचारणाऱ्या म्हातार्‍या आई ला किती दिवस उडवा उडवीची उत्तरे देवू.?
डोक्यावरचा कर्जाचा डोंगर आणि मार्च एंड  मुळे बँकेचे कर्मचारी आता घरापर्यंत पोहोचत आहेत व्यवसायाच्या भरोशावर केलेले आर्थिक व्यवहार कसे मिटणार एकीकडे आणि दुसरीकडे नव्याने सर्व काही उभा करायचे… हे सर्व कसे करू?
विम्याचा कालावधी दुर्दैवाने संपलेला त्यामुळे तिकडूनही काही आशा नाही?
काय करू? कसे उभे राहु?
मी कष्ट करेल… उभा राहील.. पण अन्यायाने मोकलून पडलोय.. अस्वस्थ्य झालोय…!!
मला न्याय पाहिजे…
मी लढणार… संघर्ष करणार..
मला आशीर्वाद पाहिजेत,  पाठींबा पाहिजे… आपली साथ पाहिजे…! मानसिक बळ पाहिजे…!
आप्त,  स्वकीय,  मित्र आणि समाजातील माणुसकीला माझी आर्त विनंती आहे, हाक आहे…
मला न्याय मिळविण्यासाठी कृपया साथ द्या…!!
आपला
गणेश राऊत

    रोटरी क्लबचे पदाधिकारी कधी धावनार सहकार्याच्या मदतीला 

      ज्याच्यावर उपजीविका आहे असा व्यवसायचं जळून खाक झाला आणि  आपल्या एका सहकार्याचे आयुष्य यातून उद्वस्त झालेले असताना रोटरी क्लबचे पदाधिकारी मात्र आपल्या सहकार्याच्या मदतीला कुठे धावताना दिसून येत नसून त्यांच्या मदती साठी त्यांनी काहीही केल्याचे एकण्यात नाही हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!