ताज्या घडामोडी

ऊसाचा ट्रक पलटी ऊसाच्या मोळ्यांखाली दबून 6 जणांनी तडफडत प्राण सोडले तर 11 जण जखमी 

ऊसाचा ट्रक पलटी ऊसाच्या मोळ्यांखाली दबून 6 जणांनी तडफडत प्राण सोडले तर 11 जण जखमी 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )

   उसाच्या ट्रकचा भीषण अपघात होऊन या अपघातात उसाच्या ट्रक खाली दबून 6 मजुरांचा तडफडून मृत्यू झाला असून 11  मजूर जखमी झाल्याची दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड  पिशोर रस्त्यावर रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.  ऊसतोड मजूरांवर एकाएकी काळानं घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

17 मजूर ऊसाच्या मोळ्यांखाली दबले, 6 जणांनी तडफडत प्राण सोडले

पुढे आलेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही. किंबहुना उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने यात 4 मजूर ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे. किसन धन्नू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, विनोद नामदेव चव्हाण, मिथुन महारू चव्हाण, कृष्णा मुलचंद राठोड (सर्व रा. सातकुंड) व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण (रा. बेलखेडा ह. मु. सातकुंड ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव असल्याचे समजतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!