जागतिक महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड जिल्हा हादरला
जागतिक महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड जिल्हा हादरला
बीड (प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनीच एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा या ठिकाणी घडली असून या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली. हे प्रकरण ताजं असतानाच बीडमध्ये आणखी एका अत्याचाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
रक्षकच झाला भक्षक!
पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती अमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाण घेवाण झाली.
रक्षकच भक्षक बनले असून दादा मागायची कोणाकडे असा सवाल महिलावर्ग करताना दिसत आहे. जागतिक महिला दिनीच्या औचित्यावर राज्यात नारी शक्तिचा जागर केला जात असतानाच बीडमध्ये पुण्यासारखी घटना घडली. बीडच्या या घटनेत पोलिसानेच तरूणीचे लचके बसमधून खाली उतरवून तोडले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पीडित तरूणी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून बीडला येत होती. यावेळी पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार गडकर यांने तिला बस मधून उतरवून दुपारी 1 वाजण्यांच्या सुमारास पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन या तरूणीवर बलात्कार केला.
तर तरूणीने आरओरड करण्याचा प्रयत्न करताच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून आत टाकेन अशी धमकी देत गप्प करत बलात्कार केल्याची तक्रार त्या तरूणीने केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव ठाणे अमलदार उद्धव गडकर असे आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्या तरूणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच आरोपी उद्धव गडकरला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आसून पुढील तपास सुरु आहे.
