कैलास बोराडे या युवकाचा अमानुष पणे छळ करनाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी उपजिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी
कैलास बोराडे या युवकाचा अमानुष पणे छळ करनाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी
उपजिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यातील अन्वा येथील कैलास बोराडे या युवकाचा अमानुष पणे छळ करनाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आंबजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
भोकरदन तालुका, जालना जिल्ह्यात कैलास बोराडे नावाच्या धनगर तरुणावर गावातील काही गावगुंडांनी अमानुषपणे अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनातं म्हंटले आहे की, मोजे अन्वा, ता. भोकर जि. जालना येथील धनगर समाजातील कैलास गोविंद बोराडे यास तेथीलच कांही गावगुडांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे हा दर्शनासाठी गेला होता तेव्हा तु मंदीरात का प्रवेश केलास असे म्हणुन जात वर्चस्वातुन लोखंडी सळई विस्तवात गरम करुण त्याच्या पार्श्वभागात व शरीवार अनेक ठिकाणी चटके देवुन अमानुषपणे अनन्वीत छळ करुण जिवे मारण्याचा प्रयत्न केला हि घटना पुरोगामी महाराष्ट्राला व मानवतेला काळीमा फासणारी असुनण अशोभणीय आहे. त्यामुळे सदर घटनेतिल सर्व आरोपींना तात्काळ पकडूण त्यांच्यावर मकोका सारखा गुन्हा नोंद करुन आरोपीस तात्काळ अटक करुण कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा सदर घटणेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या निवेदना द्वारे देण्यात आला असून या प्रसंगी व्यंकटेश चामनर सर, चंद्रकांत हजारे, नामदेव गडदे, कृष्णा काळे, ॲड. विकास भुरे, प्रवीण पितळे, अंकुश ढोबळे, अनंत गोचडे, प्रवीण दासुद, ॲड. गायके, ॲड. प्रशांत पवार व इतर बांधव उपस्थित होते.
