19 वर्षीय नराधमाची भावकीतील 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी, नकारानंतर भयंकर वार, 280 टाके!
19 वर्षीय नराधमाची भावकीतील 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी, नकारानंतर भयंकर वार, 280 टाके!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली असून भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. मरणयातनां पेक्षा भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अभिषेक तात्याराव नवपुते असं या आरोपीचं नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलेच नाही अशा आविर्भावात नराधम आरोपी फिरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर 36 वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती वार केले आहेत. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे.
डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं
पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, तिला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा येतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणते.
अंगावरती 280 टाके, दोऱ्याचा खर्च 22 हजार
भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी 19 वर्षांच्या तरुणाने केली. तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागलेत. तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे. भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना 11 वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. पिडीतेच्या अंगावर 280 टाके पडले आहेत, यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्चच 22 हजार इतका आला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पिडीतेने ही माहिती दिली आहे.
