Sunday, June 8, 2025
ताज्या घडामोडी

स्वाराती रुग्णालय परिसरातील निवासस्थानांच्या कामाची आ. नमिता मुंदडा यांनी केली पाहणी

स्वाराती रुग्णालय परिसरातील निवासस्थानांच्या कामाची आ. नमिता मुंदडा यांनी केली पाहणी

अंबाजोगाई – स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालय परिसरात वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांसाठी उभारल्या जात असलेल्या नवीन निवासस्थानांच्या कामाची केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

रुग्णालयातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या निवासस्थानांचे पुनर्बांधणी प्रकल्प आ. नमिता मुंदडा यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे. या अंतर्गत १५० कोटी रुपये निधीच्या मदतीने नव्या इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आ. नमिता मुंदडा या कामाच्या दर्जावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. नुकतेच त्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

आ. मुंदडा यांनी या बांधकामाची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या नवीन इमारतींचे काम पूर्ण झाल्यानंतर स्वाराती रुग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाची निवासस्थाने उपलब्ध होतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याचे आ. मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!