शिरूर मधील त्या व्यक्तीस अमानुष मारहाण बीड जिल्ह्याची गुंडगिरी कधी संपणार?
शिरूर मधील त्या व्यक्तीस अमानुष मारहाण बीड जिल्ह्याची गुंडगिरी कधी संपणार?
बीड (प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असताना जिल्ह्यातील आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आसुन बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडल्या नंतर या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
बीड जिल्ह्यात गुंडगिरी सुरुच असल्याचे दिसत आहे. बीडच्या शिरुर तालुक्यातील बावी गावात अमानुष माराहणीचा एक प्रकार घडला आहे. बावी घावात एका व्यक्तीला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अद्याप शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
व्यक्तीला बॅटने मारहाण
शिरूर तालुक्यातील बावी गावात व्यक्तीला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या व्यक्तीला अत्यंत अमानुष पद्धतीने बॅटच्या साहाय्याने मारहाण केली जात आहे. ही मारहाण अत्यंत धक्कादायक आहे. ही मारहाण अत्यंत अमानुष पद्धतीने केली जात आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे. सतिश भोसले असे या मारहाण करत असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. तर यावेळी काही जण पीडित व्यक्तीच्या आजूबाजूला उभे असल्याचे दिसत आहे. त्यातील काही व्यक्ती देखील मारहाण करताना दिसत आहे. अत्यंत क्रूरपणे पीडित व्यक्तीला मारहाण केली जात आहे. पीडित व्यक्ती कोण आहे, त्याला मारहाण का केली जात आहे, याविषयी अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
