शतकोत्तर वाटचाल करणारी योगेश्वरी शिक्षण संस्था इतर शिक्षण संस्थासाठी दिपस्तंभ असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध आहे
शतकोत्तर वाटचाल करणारी योगेश्वरी शिक्षण संस्था इतर शिक्षण संस्थासाठी दिपस्तंभ असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध आहे
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांचे प्रतिपादन
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
शतकोत्तर वाटचाल करणारी व शिक्षण क्षेत्रात दिपस्तंभ असणारी योगेश्वरी शिक्षण संस्था परिवर्तनाच्या दिशेने जाताना सामाजिक दायित्व , ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे मत राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी व्यक्त केले.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने नागापूरकर सभागृहात ४ मार्च मंगळवार रोजी
विविध जिल्ह्यातील मुख्याध्यापक तसेच विज्ञान,गणित शिक्षकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते.
व्यासपीठावर शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकूंद,शिक्षण सहसंचालक डॉ.सतीश सातव,अंजली पालकर, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले,गट शिक्षणाधिकारी सी.आर.शेख,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. योगेश सुरवसे, परभणीच्या मुख्याध्यापक संघाचे सचिव गणेश शिंदे,योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, परभणी येथील शिक्षण तज्ञ महेश पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महेश पालकर म्हणाले की, समाजाच्या तळागाळातील विद्यार्थी शिकावा यासाठी १०८ वर्षापासून योगेश्वरी शिक्षण संस्था निष्ठेने, समर्पित भावनेतून कार्य करीत असून हजारो विद्यार्थी विदेशात,देशात विविध स्तरावर कार्यरत आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्थेने तारांगण प्रकल्पाचा केलेली निर्मिती ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीची मोठी उपलब्धी असून यातूनच विज्ञानाचा प्रचार व प्रसार होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकूंद म्हणाले की, योगेश्वरी शिक्षण संस्थेला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास असून ही संस्था विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असून देशाचे वैभव उभे करण्याचे काम या संस्थेतून होते संस्काराचे पोषण करण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थांची गरज असून विश्वात होणारे बदल पोहंचविण्याचे काम अशाच संस्थांच्या माध्यमातून होऊ शकते असेही ते म्हणाले. शिक्षण उपसंचालक गणपत मोरे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने परंपरा जपत विज्ञान आणि संस्कृती यांचा वारसा जपला आहे विद्यार्थ्यात गुणवत्ता निर्माण करण्याचे काम होते.
महेश पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना आधार वाटणारी योगेश्वरी शिक्षण संस्था सर्वोत्तम आणि दिशादायी संस्था आहे. अध्यक्षीय समारोप करताना चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले की,योगेश्वरी शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केलेले दिशादायी कार्य, अविश्रांत परिश्रम,योग्य निर्णय, सर्वांचे सहकार्य यातूनच संस्थेचे विकासात्मक कार्य पुढे जात असल्याचे म्हणाले. मान्यवरांचे स्वागत योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, विविध विभागांचे प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले.
तारांगण प्रकल्प, हैदराबाद मुक्ती संग्राम केंद्र याची पाहणी पाहुण्यांनी केली
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात उपाध्यक्ष जी.बी.व्यास यांनी संस्थेचा पूर्व इतिहास व आगामी ध्येय धोरणे सांगितली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.संपदा कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार सचिव कमलाकर चौसाळकर यांनी मानले. यावेळी विविध ठिकाणाहून आलेले शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
