संतोष देशमुख पाठोपाठ महाराष्ट्राला हादरवणारी घटना, विकृतीचा कळस! चूल, लोखंडी रॉड अन् अर्धनग्न तरुण… आरोपी सोनू दौंड यास अटक
संतोष देशमुख पाठोपाठ महाराष्ट्राला हादरवणारी घटना, विकृतीचा कळस! चूल, लोखंडी रॉड अन् अर्धनग्न तरुण… आरोपी सोनू दौंड यास अटक
जालना (प्रतिनिधी)
जुन्या वादातून जालना जिल्ह्यात एका 36 वर्षीय तरुणाला निर्वस्त्र करुन आणि चुलीवर लोखंडी रॉड गरम करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आसुन महाशिवरात्री च्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्याच्या कारणास्तव नाराधमाणी हे कृत्य केल्याचे ट्विट आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सोनू दौंड याला अटक केली असून 1 जण फरार आहे.
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने राज्य हळहळ करत असताना या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आसुन हा विकृत प्रकार जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे घडला आहे. जुन्या शेतीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
36 वर्षीय व्यक्तीला चुलीमध्ये तापलेल्या गरम लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण अमानुष पद्धतीने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. कैलास बोरडे असं या अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या मारहाणी विरोधात दोन जणांविरुद्ध पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण शेतीवरुन झालेल्या जुन्या वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काय आहे नेमका वाद?
नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी आरोपींची नावे आहेत. कैलास बोराडेचं नवनाथ दौंड सोबत मागील काही दिवसांपूर्वी शेतीच्या प्रकरणातून वाद झाला होता. या वादातून ही मारहाण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वादातून नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड यांनी कैलास बोराडे यास केलेली मारहाण ही क्रूरतेचा कळस आहे. चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम करुन कैलासच्या पायाटा, पोटाला आणि पाठीला तसेच मानेवर गंभीर जखमा केल्या आहेत.
उपमुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे.आतापर्यंत कैलास बोराडे यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिलाय.तसेच त्यांचा सर्व वैद्यकीय खर्च करण्याचं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोराडे यांना दिलं आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोनू दौंड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार झालेला नवनाथ दौंड हा शिवसेना उबाठाचा तालुका प्रमुख असल्याचे बोलल्या जात आहे. पारध पोलीस अधिक तपास करत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला !
गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख “निर्दयी” असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !