धक्कादायक—- अंबाजोगाई शहरातून आठ दिवसांतुन 4 मुलींचे पलायन 3 ला शोधण्यात पोलिसांना यश
धक्कादायक
अंबाजोगाई शहरातून आठ दिवसांतुन 4 मुलींचे पलायन 3 ला शोधण्यात पोलिसांना यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील आठ दिवसात अंबाजोगाई शहरातून 4 मुलींनी आपल्या प्रियकरा सोबत पलायन केल्या नंतर पोलिसात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी 3 मुलींना शोधण्यात यश आले असून पालकांनी अधिक जागरूक होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या विषयी पोलीस सूत्रा कडून धक्का दायक माहिती हाती आली असून मागील वर्ष भरात अंबाजोगाई शहरातून अल्पवयीन, सज्ञान या सह विवाहित महिला आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्या नंतर पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी बहुसंख्य प्रकरणाचा शोध घेऊन अज्ञान मुली वगळता अन्य सज्ञान व विवाहित महिलांची त्यांच्या इच्छे नुसार रवानगी केली आहे.
विशेष धक्का दायक माहिती म्हणजे मागील 8 दिवसात शहरातून 4 मुलींनी पलायन केल्याच्या तक्रारी संबंधित मुलींच्या पालकांनी पोलिसात दिल्या होत्या. या सर्व मुली 18 वर्षाच्या आतील असल्याने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस पथकांनी तपास करून 3 मुलींना परत आणण्यात यश मिळवले असून 1 जनींचा शोध शुरु आहे.
पालकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता – पो नि विनोद घोळवे
सध्या 10 वी, 12 वी सह सर्वच वर्गाच्या परीक्षा सुरु आसल्याने मागील काही काळा पासून सुरु असलेल्या मुला मुलींच्या भेटीचे रूपांतर आगामी काळात आपल्या आई वडिलांना चकवा देऊन फरार होण्यात होऊ शकते. या मध्ये काही मुले मुली आज्ञान पणाने पळून जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्या मुळे पालकांची चिंता वाढू शकते आणि हे सर्व टाळण्यासाठी पालकांनी डोळ्यात तेल घालून आपल्या पाल्ल्या वर करडी नजर ठेऊन जागरूक राहण्याची आवश्यकता आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी झुंजार न्युज च्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.
