एका चुकीमुळे वाल्मीक गँग फसली अन् सीआयडीच्या हाती लागले पुरावे
एका चुकीमुळे वाल्मीक गँग फसली अन् सीआयडीच्या हाती लागले पुरावे
बीड (प्रतिनिधी)
दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या प्रत्यक्ष खुनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले. यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला. खंडणी, हत्या आणि अॅस्ट्रोसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आसताना एका चुकी मुळे वाल्मिक कराड यांची गँग कशी फसली याचे पुरावे सी आय डी च्या हाती लागले आहेत.
सीआयडीने बीडच्या विशेष कोर्टात आरोप पत्र दाखल केलं आसुन या प्रकरणात सीआयडीने आठ जणांना आरोपी ठरवलं आहे, त्यांचा खून खंडणी आणि अॅट्रोसिटी प्रकरणात सहभाग असल्याचं आरोप पत्रात नमूद केलं आहे. तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं आरोप पत्रात म्हटलं आहे. हे तिन्ही गुन्हे खंडणीच्या कारणातून झाल्याचं देखील आरोप पत्रात नमूद आहे. हा कट कुठे रचला, यात कुणाचा सहभाग होता, याबाबतचे सबळ पुरावे हाती लागल्यानेच वाल्मीक कराडसह त्याच्या टोळीवर आरोप निश्चिती करण्यात सीआयडीला यश आलं.
वाल्मीक कराड टोळी कुठे चुकली?
9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले. त्यानंतर त्यांनी काळी जीप आणि कार अशा दोन वाहनांमधून देशमुखांचं अपहरण केलं होतं. पण ज्या काळ्या रंगाच्या गाडीतून देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, तीच गाडी वाल्मीक गँगसाठी कर्दनकाळ ठरली आहे. या गाडीत आढळलेल्या पुराव्यांमुळे वाल्मीक कराडसह त्याच्या टोळीभोवत फास घट्ट करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे.
कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जी काळ्या रंगाची गाडी वापरली होती. त्यात पोलिसांना 19 महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ठरली महत्त्वाची ठरली. ही चूक झाली नसती तर मारेकऱ्यांना संतोष देशमुखांचा खून पचवता आला असता, सबळ पुराव्याआभावी आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असता पण या एका चुकीमुळे आरोपी पूर्णपणे फसले.
सुदर्शन घुलेच्या कारमधून कोणते पुरावे सापडले…
– आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.
– कारमधून दोन गॉगल्स सापडले
– सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॉकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.
– सहा आरसी बुक सापडले
– सुदर्शन घुलेचे, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप सापडला
– लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार
– रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा सापडला सापडला…
