संतोष देशमुख प्रकरण व प्रकृती अस्वस्थ्याच्या कारनास्तव ना धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
संतोष देशमुख प्रकरण व प्रकृती अस्वस्थ्याच्या कारनास्तव ना धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
मुबंई (प्रतिनिधी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्र सादर केल्यानंतर त्यातले फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. दरम्यान, राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय.
धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्येच्या फोटोंवरही प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.
माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे .त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितलं की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलाय. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाईकरता राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर असल्याचं म्हटलंय. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीना दिलाय असं सांगितलं. दरम्यान, यावर भाजपच्या केज मतदारसंघातील आमदार नमिता मुंदडा यांनी नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करताना राजीनामा आधीच द्यायला हवा होता असं म्हटलंय.
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
ना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर जे ट्विट केल आहे त्यात त्यांनी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण दाखवलं असून संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित जे भाष्य करायला हवे होते ते न केल्याने विरोधक पुन्हा नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.
