मोटारसायकलला वाचविण्याच्या नादात एसटी बसचा भीषण अपघात, ३ ठार, 25 जखमी ; थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मोटारसायकलला वाचविण्याच्या नादात एसटी बसचा भीषण अपघात, ३ ठार, 25 जखमी ; थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
लातूर (प्रतिनिधी)
एका मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने एसटी विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी होऊन घासत गेल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 25 जण जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील लातूर -चाकूर रोड वरील नांदगाव पाटी नजिक घडली.
लातूरच्या चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटी नजिक आज दुपारी 1.40 वाजण्याच्या सुमारास एसटीचा हा भीषण अपघात झाला असून प्राथमिक माहिती नुसार यात तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त आहे..
हा थरारक अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आसुन थांबलेला दुचाकी स्वार अचानक वळण घेऊन रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना मागून आलेल्या एस टी च्या चालकाचे दुचाकी स्वारास वाचवण्याच्या नादात एस टी च्या स्टेरिंग वरील नियंत्रण सुटले व एस टी विरुद्ध दिशेला जाऊन पलटी होऊन दुरवर घासत गेली. या भीषण अपघातात पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात अनेकांचे हात तुटले आहेत असून अपघात स्थळी जखमी प्रवाशांची बोटे तुटून पडली होती. पोलिस आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी पोहचून जखमींना हाॅस्पिटलमध्ये पोहचिवले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
