ताज्या घडामोडी

मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले, 9 जणांना अटक 

मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले, 9 जणांना अटक 

अहिल्या नगर 

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करीत खून केल्याची घटना ताजी असताना अहिल्यानगर शहरात अशीच एक घटना घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी 9 आरोपीस अटक केली आहे.

जुन्या भांडणातून एका युवकाचे भर दुपारी अपहरण करण्यात आले. त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कारमधून डोंगरात जाळून तेथील हाडे आणि राखही फेकून देऊन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पोलिसांना नऊ जणांना अटक केली आहे.

नगरमधून गेल्या शनिवारी अपहरण करण्यात आलेल्याची घटना उघडकीस आली, सुरवातीला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) याचे २२ फेब्रुवारीला अपहरण झाले होते. सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी (वय २३, रा. एमआयडीसी, नवनागापूर, ता. जि. अहिल्यानगर), सुमित बाळासाहेब थोरात (वय २४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारोतीराव पाटील (वय २६, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, जि. अहिल्यानगर), नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (वय २५, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) या आरोपींना अटक केली.

 

 

पोलिसांना सांगितले की, आम्ही आरोपीचे अपहण केले, मात्र तो आमच्या ताब्यातू पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा शोधाशोध सुरू केली. संपूर्ण परिसर पोलिसांना पिंजून काढला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून विशाल दिपक कापरे, (वय २२, रा.चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी), विकास अशोक गव्हाणे, (वय २३, रा.वडगाव गुप्ता, ता.जि.अहिल्यानगर, करण सुंदर शिंद (वय २४, रा.शिवाजीनगर, नवनागापूर, एमआयडीसी), रोहित बापुसाहेब गोसावी (वय २०, रा.गजानन कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी) व स्वप्नील रमाकांत पाटील, (वय २३ रा.साईराजनगर, नवनागापूर, एमआयडीसी) यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांकडे गुन्हयाची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेची माहिती दिली. यातील युवक वैभव नायकोडी २२ फेब्रुवारीला दुपारी केस कापण्यासाठी घराजळील सलूनमध्ये गेला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही, म्हणून त्याची आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली. जुन्या भांडणातून त्याचे अपहरण झाल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. पाच आरोपींना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!