ताज्या घडामोडी

देशाच्या विकासासाठी शांतीची आणि सद्भावनेची गरज-आर्किटेक्ट अर्शद शेख

देशाच्या विकासासाठी शांतीची आणि सद्भावनेची गरज-आर्किटेक्ट अर्शद शेख

*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
अंबाजोगाई येथे पिस फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यमान परिस्थितीवर आढावा घेण्यासाठी आणि येणार्‍या काळात ज्यावर मात करण्यासाठी हालात बदल सकते है या शिर्षकाखाली अहमदनगर येथील आर्किटेक्ट अर्शद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शेख यांनी विद्यमान परिस्थितीवर बोलताना भाष्य केले की देशाच्या विकासासाठी शांतीची आणि सद्भावनेची नितांत आवश्यकता असून जो व्यक्ती, जे राज्य, जो देश याचा अंमल करेल तोच पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला.
पीस फाउंडेशन अंबाजोगाईच्या वतीने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. 26 फेबु्रवारी रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आकर्षण होते ते पिस फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख या प्रसंगी व्यासपीठावर अलखैर पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अर्शद शेख म्हणाले की आपल्या देशासमोर अनेक समस्या व अनेक आव्हाने आहेत त्याचा सामना केला नाही किंवा त्याचे निराकरण केले नाही तर ती समस्या गंभीर स्वरुप धारण करत असते. सध्याचे राज्यकर्ते मग तो पक्ष व संघटना कोणतीही असो ते समस्या सोडविण्याऐवजी ती जटील करत आहेत आणि सामान्य माणसाची दिशाभुल करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी शांती आणि सद्भावनेची नितांत आवश्यकता आहे. द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पुल बनविण्याची गरज आहे. सामुहिक प्रयत्नातूनच देश शक्तीशाली व प्रबळ बनणार आहे. सामाजाच्या अद्योगतीचे प्रमुख कारण म्हणजे समाजातील ज्ञानी आणि जबाबदार लोकांनी तोंड गप्प ठेवले आहे त्यामुळे सामाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. देशाच्या विकासासाठी राज्यकर्ते जो प्रयत्न योगदान देत नाहीत तोपर्यंत समाजाचा विकास शक्य नाही आज समााजासमाजात शांती, स्नेह, आणि बंधुभाव निर्माण व्हावून भारतीय समाज एकसंघ व्हावा यासाठी पीस फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. समाजाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास पीस फाउंडेशनचे ध्येय आहे. या चळवळीला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे किंवा ज्यानां यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी चळवळ म्हणून यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. प्रांरभी पीस फाउंडेशनचे जिल्हा संघटक मिर्झा अफसर बेग यांनी फाउंडेशनची उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली सांगितली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अलखैर पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक सर यांनी केले. सुत्रसंचलन शेख रिजवान यांनी तर आभार प्रदर्शन खतीब मोहम्मद मुज्जमील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. कुराण पठण शेख फुरखाँन मुजाहेद यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष शेख अब्दुल रहीम साहब, खमरोद्दीन फारुकी व इतर मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलखैर पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, सहकारी, हितचिंतक, स्नेहीजण, यांनी प्रयत्न केले. वेगवेगळ्या घटकातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!