Skip to content
अधिकाऱ्यांच्या नजरेत बीड उतरले तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज, कारणेही सांगितली

बीड (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड चा बिहार झाला आहे अशी प्रतिमा देशभरात उमतल्याने जिल्ह्यातील तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आसुन पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नको. अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्याची प्रतिमा, पोलिसांवरील सातत्याचे आरोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर जिल्ह्यांतील अधिकारी येथे येण्यास तयार नाहीत. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता नोकरी धोक्यात येईल की काय, अशी भीती वाटते. त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विनंती बदलीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. पोलीस महासंचालकांकडे 59 अर्ज आणि आयजींकडे 48 अर्ज आहेत.
पोलिस महासंचालकांकडे 8 वर्षे पूर्ण झाल्याने बदलीपात्र 9 पोलिस निरीक्षक आणि 6 सहायक निरीक्षकांनी अर्ज केले. विनंती बदलीसाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 10 पोलिस निरीक्षक, 15 सहायक पोलिस निरीक्षक, 16 पोलिस उपनिरीक्षक, तांत्रिक शाखेतील 4 अधिकारी आणि महामार्ग विभागातील 3 अधिकाऱ्यांनी अर्ज केले, अशी माहिती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली.
तसेच महानिरीक्षकांकडे 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने 2 पोलीस निरीक्षक, 7 सहायक पोलिस निरीक्षक आणि 6 पोलीस उपनिरीक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले. विनंती बदलीसाठी 6 पोलिस निरीक्षक, 8 सहायक पोलिस निरीक्षक आणि 19 पोलिस उपनिरीक्षकांनी अर्ज केले आहेत. या अर्जांमागे प्रशासकीय कारणे, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची आजारपण अशी कारणे देण्यात आली आहेत.
बदलीसाठी अर्ज केलेल्या 107 अधिकाऱ्यांपैकी 24 जणच प्रशासकीय बदलीसाठी पात्र आहेत. उर्वरित 84 जणांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत. बीड जिल्ह्याची प्रतिमा, पोलिसांवरील सातत्याने होणारे आरोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर जिल्ह्यांतील अधिकारी येथे येण्यास तयार नाहीत.
दरम्यान, बीडमध्ये नोकरी धोक्यात येईल, अशी भीती वाटते, त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विनंती बदलीसाठी अर्ज दाखल झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी केली जात आहे. व त्याच मानसिकते मधून पोलीस अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
Post Views: 141
error: Content is protected !!