घरगुती वादातून पत्नीला पाजलं विष मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा घटनेने खळबळ
घरगुती वादातून पत्नीला पाजलं विष मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा घटनेने खळबळ
बीड (प्रतिनिधी)
कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या विष देऊन तिची हत्या केल्याची क्रूर घटना बीडमध्ये घडली आसून कोमल नागेश पाटोळे असं मृत महिलेचे नाव आहे. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याचे वृत्त आहे.
विवाहितेला बळजबरीने पतीने विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे उघडकीस आली आहे. कोमल नागेश पाटोळे असं मयत महिलेचे नाव आसुन सात वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पाटोळा दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.मात्र घरगुती वादातून पतीने बळजबरीने विष पाजले असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली
पती आणि पत्नीमधील वाद इतका टोकाला पोहोचला की, संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीला विषारी औषध पाजले. या प्रकरणात केवळ पती सहभागी नव्हता तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता, असा नातेवाईकांचा आरोप आहे विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उशीर झाला.
बीड जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
या संदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे..
