ताज्या घडामोडी

डॉ ज्ञानेश्वर दराडे व डॉ एकनाथ शेळके यांची टीम म्हणजे स्वा रा ती रुग्णालयातील नेत्र रुग्ण विभागाला लाभलेले वरदान

डॉ ज्ञानेश्वर दराडे व डॉ एकनाथ शेळके यांची टीम म्हणजे स्वा रा ती रुग्णालयातील नेत्र रुग्ण विभागाला लाभलेले वरदान

दरमहा 3500 नेत्र रुग्णांवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून दिल्या जातेय नवी दृष्टी

अंबाजोगाई (दत्तात्रय अंबेकर)
   स्वा रा ती रुग्णालयातील नेत्र रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ ज्ञानेश्वर दराडे व त्यांचे सहकारी सहयोगी प्राध्यापक डॉ एकनाथ शेळके आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेत्र रुग्णांची सेवा करणारी डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची टीम ही खरोखरच नेत्र रोग विभागाला एक प्रकारे वरदान ठरली आसुन या विभागात दरमहा 3500 नेत्र रुग्णांवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून ही टीम या रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे काम करत असल्याने या  टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

     अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील ग्रामीण रुग्णासाठी एक प्रकारे संजीवनीच असुन या रुग्णालयात येणाऱ्या सर्वच प्रकारच्या रुग्णांना येथील डॉक्टर व कर्मचारी जी सेवा देतात त्याचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
     याच रुग्णालयातील अत्यन्त संवेदनशील मानला जाणारा विभाग म्हणजे नेत्र रोग विभाग. मराठवाड्याच्या काना कोपऱ्या मधून या विभागात आपली दृष्टी गमावलेले व अन्य डोळ्यांच्या आजाराचे हजारो रुग्ण दरवर्षी उपचार घेण्यासाठी येत असतात. पूर्वी या विभागाची धुरा या रुग्णालयाचे सेवा निवृत्त अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांच्यावर होती. त्यांच्या काळात डॉ खैरे सह डॉ डोंगरे व डॉ एकनाथ शेळके या तिघांचे स्वतंत्र युनिट होते. मात्र डॉ खैरे सेवा निवृत्त झाले, डॉ डोंगरे आजारी असल्याने ते कायमस्वरूपी रजेवर गेले. त्यामुळे मधल्या कालावधी मध्ये या नेत्र रोग विभागाची संपूर्ण धुरा ही सहयोगी प्राध्यापक डॉ एकनाथ शेळके यांच्यावर येऊन ठेपली आणि त्यांनी हा विभाग यशस्वी रित्या सांभाळला.  

   त्या नंतर या विभागात विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक डॉ ज्ञानेश्वर दराडे हे दाखल झाले असुन आज डॉ ज्ञानेश्वर दराडे व डॉ एकनाथ शेळके यांची टीम म्हणजे स्वा रा ती रुग्णालयातील नेत्र रुग्ण विभागात करत असलेले कार्य हे  कौतुकास्पद आहे. 

    स्वा रा तीचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, अधीक्षक डॉ राकेश जाधव यांच्या मार्गदर्शना खाली डॉ ज्ञानेश्वर दराडे, डॉ एकनाथ शेळके व त्यांच्या सोबत या विभागात कार्यरत असलेले त्यांचे सहकारी डॉक्टर व कर्मचारी यांची टीम म्हणजे नेत्र रोग विभागाला लागलेले वरदानच आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

    आज या विभागात दररोज किमान 100 डोळ्यांच्या आजाराचे नवीन रुग्ण तपासणी साठी येत असतात म्हणजे वर्षा काठी 30 ते 35 हजार रुग्ण तपासणीसाठी येतात तर वर्ष भरात साडेतीन हजारच्या वर दृष्टी गमावलेल्या नेत्र रुग्णावर डॉ शेळके व त्यांची टीम अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे पुण्याचे काम करत आहे.


     डॉ ज्ञानेश्वर दराडे व डॉ एकनाथ शेळके व त्यांच्या टीमची खासियत ही आहे की या विभागात उपचार घेण्यासाठी किंवा शस्त्रक्रिये साठी येणाऱ्या रुग्णासोबत सर्व टीम अत्यंत आपुलकीने व प्रेमाने संवाद साधताना पहावयास मिळते. डोळ्यांच्या शस्त्रक्रिये साठी येणारे रुग्ण म्हणजे शक्यतो 50 ते 90 या वयोगटातील विविध तऱ्हेचे रुग्ण असतानाही या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणारे डॉ ज्ञानेश्वर दराडे व  डॉ.एकनाथ शेळके सर यांच्या खांद्याला खांदा लावून नेत्र रोग विभागात आज कार्यरत सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलम कवडे, जेष्ठ निवासी डॉक्टर डॉ.अभिजित अरसूळ, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. जवेरिया शेख, डॉ.समिक्षा पराते, डॉ सूरज अवघडे, डॉ नीलेश जायभाये, डॉ संजना पाष्टे, डॉ कोमल तायडे, डॉ संतोष चांदणे, डॉ प्राची गिरवीकर, डॉ हर्षदा सुर्यवंशी, डॉ मृणाल जवंजाळ, डॉ नागनाथ यमगीर, डॉ खुशबू वाघेला, डॉ नेहा सोनवणे, डॉ प्रणाली जाधव, डॉ भूमिका धानोरकर, डॉ लीना पाडवी तसेच नेत्र रोग कक्षाच्या परिसेविका  आशा चंद्रकांत यादव, आधीपरिचारिका मंगल सुभाष राठोड, विद्या किशनराव आकनगिरे त्यांच्या सोबत कार्य करणाऱ्या  सर्व परिचारिका संतोष शिनगारे सह सर्व चतुर्थ कर्मचारी नेत्र रुग्ण शस्त्रक्रिये साठी दाखल झाल्या पासून शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर त्याला नेत्र कक्षातून सुट्टी देई पर्यंत 24 तास नेत्र रुग्णांना केवळ आपली सेवा देत नाहीत तर या विभागातील वातावरण प्रफुल्लित ठेवण्या साठी महत्वाचे योगदान देत आहेत.

    ज्या वेळी नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येते त्या नंतर एक दिवस रुग्णालयामध्येच त्यांच्या डोळ्यावर करडी नजर ठेवत त्याला त्यांच्या घरी ज्या वेळी पाठवण्यात येते त्या वेळी डॉ ज्ञानेश्वर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ शेळके हे सर्व रुग्णांना एकत्रित बोलावून शत्रक्रिये नंतर 40 दिवस दिवस डोक्याहुन अंघोळ करायची नाही, डोळ्यावर ताण पडेल असं कुठलंही कृत्य करायचे नाही, डोळ्यात औषध कशा पद्धतीने टाकायचे यासह डोळ्यांची निघा कशा पद्धतीने घ्यायची या संदर्भातील सूचना आपल्या आई वडिलांना, मोठ्या भावांना ज्या पद्धतीने समजून सांगायच्या अगदी त्याच पद्धतीने समजुन सांगतात, डॉ शेळके यांची रुग्णांना आपुलकीने सांगण्याची जी पद्धती आहे ती खरोखरच त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्या साठी एक प्रकारचं प्रशिक्षणचं आसून डॉ शेळके व त्यांच्या या कार्य पद्धतीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे हे मात्र निश्चित.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!