ताज्या घडामोडी

स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे (प्रतिनिधी)

    स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय  गाडे यास अखेर पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पाहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र काल सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.

दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती. तसेच 250 पोलीस  कर्मचारी, डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही आरोपीची शोधमोहीम सुरु आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते..

   बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत
होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांची पथक पुण्याच्या आले असून त्याला लष्कर पोलिस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

      आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्या नंतर या घटनेचे वास्तव समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!