*मोदी लर्निंग सेंटर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
मोदी लर्निंग सेंटर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मोदी लर्निंग सेंटरच्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई येथे कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी शाळेचा मूल्य शिक्षणाचा परिपाठ मराठी भाषेतून सादर केला . संगीत समूहाने मराठी भाषेचे गौरव गाणारे गीत सादर केले तसेच मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शाळेत मराठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत इयत्ता चौथी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इंग्रजी माध्यमाची शाळा व विद्यार्थी असताना देखील अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या उत्तम हस्ताक्षरांचा नमुना या सहभागी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून दिसून आला . प्रत्येक वर्गाच्या विजेत्या स्पर्धकांना प्रथम , द्वितीय व तृतीय अशा प्रकारची बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आली. संस्थेचे प्राचार्य रेंजु आर चंद्रन यांनी सर्व विद्यार्थ्यांना व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी , कार्यकारी संचालक संकेत मोदी , संस्थेचे मार्गदर्शक वसंतराव चव्हाण , मार्गदर्शक प्राचार्य डी. एच. थोरात , मार्गदर्शक बी. आय खडकभावी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी , शिक्षक ,पालकांना शुभेच्छा दिल्या .
