पोलिस अधिकारी व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने घाटनांदूर येथे अवैध धंदे, मटका घेणाऱ्या दोघांवर गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, दोघांवर कारवाई
पोलिस अधिकारी व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने घाटनांदूर येथे अवैध धंदे, मटका घेणाऱ्या दोघांवर गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, दोघांवर कारवाई

अंबाजोगाई (बातमीदार):
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंद्यावर लगाम घालण्याचा प्रयत्न चालवला असला तरी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत राजरोज अवैध धंदे सुरू असून या पोलिस स्टेशन हद्दी मधील घाटनांदूर येथे सुरू असलेल्या मटक्याची माहिती मिळताच सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून कल्याण मटका घेताना दोघांना रोख रक्कमेसह रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे पोलिस निरीक्षक व स्थानिक पोलिसांच्या कृपेने अवैध धंदे सुरू असून याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत पोलिस अधीक्षक चेतना तिडके गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास राठोड बालकृष्ण जायभाय नितीन वडमारे या पथकाने घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील अंबिका पान मटेरियलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटकाच्या आकड्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असताना
त्या ठिकाणी छापा मारून कल्याण मटक्याचे आकडे घेताना किशोर भास्कर जाधव व रावण व्यंका करणे (वय ५८) दोघे (रा. घाटनांदूर) यांना रंगेहाथ पकडले या पथकाने त्यांच्या कडून कल्याण मटका जुगाराचे साहित्य ३६९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
