ताज्या घडामोडी

अंबडच्या बसस्थानकात बस घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु, सहाजण जखमी

अंबडच्या बसस्थानकात बस घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु, सहाजण जखमी

अंबड (प्रतिनिधी)

   जालना जिल्हयातील अंबड येथील बसस्थानकात दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंबड आगारातून सिल्लोड येथे जाणारी बस घुसल्याने झालेल्या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जन गंभीर रित्या जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

   अंबड बस स्थानकात क्रमांक एम. एच. 20 डी. एल. 1606 हि बसगाडी जालना प्लॉटफार्मवर लावत असताना यातील बसचालक व्ही.एस. राठोड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने जालना प्लॉटफार्मवर उभी न राहता थेट प्रवाशी बसतात त्या सिमेंट खुर्ची पर्यंत गेल्याने बसस्थनात बसलेले प्रवाशी, तरुण युवक, बालक जखमी झाले आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर पाचजन गंभीर जखमी झाल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या बस अपघातामध्ये जुना जालना शहरातील शेख खलील उल्ला शेख अजीज (वय-75) व अंबड तालुक्यातील शेवगा येथील मुरलीधर आनंदराव काळे (वय-65) वर्ष हे सरळ टायरखाली गेल्याने त्यांच्या डोक्याला व हात, पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांच्यावर अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुण पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जखमीवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार –

अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी प्रवाशी, नागरीक,पोलिस व आगारातील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करुण जखमीना जालना शहरात हलविण्यात आले.

यामधील जालना येथील जखमी शेख खलील उला (वय-65), अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील दीड वर्षाचा बालक रेहान अलीम शेख, धाकलगाव येथील हिना अलीम शेख (वय-30) वर्ष, घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील पार्वती धोंडीराम नवगिरे (वय-30) वर्ष, अंबड शहरातील फुलेनगर येथील अनिता बंडू गुंजाळ (वय-40) वर्षे, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील पूजा कडूबा धोतरे (वय-44) वर्षे हे बस अपघातामध्ये गंभीर जखमा झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!