ताज्या घडामोडी

“तू माझी जिंदगी बरबाद केलीस”  तरुणीची घरात घुसून केली हत्या, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“तू माझी जिंदगी बरबाद केलीस”  तरुणीची घरात घुसून केली हत्या, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

हिंगोली (प्रतिनिधी)

   तू माझी जिंदगी बरबाद केलीस म्हणत हिंगोली जिल्ह्यातील एका नातेवाईक असलेल्या तरुणानेच घरात घुसून तरुणीची हत्या केल्याचे उघड  करण्यात आली आहे. नातेवाईक असलेल्या तरुणानेच हत्या केल्याचं उघड झालं आहे.

   हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आसुन पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणा च्या मुसक्या आवळल्या आहेत.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना खिल्लारी ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करत बसली होती. त्यावेळी आरोपी अभिषेक खील्लारी हा तीच्या घरी गेला आणि संजना कुठे आहे अशी विचारणा केली. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी संजना वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले.

त्यानंतर अभिषेक थेट वरच्या मजल्यावर गेला आणि “तू माझी बदनामी का केली, तू माझी जिंदगी बरबाद केली”, असं म्हणत संजनावर चाकूने वार केला. अभिषेकने आधी संजनाच्या छातीजवळ वार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संजना घाबरली आणि तिने गॅलरीमध्ये येऊन आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत अभिषेक याने तिच्या कमरेजवळ दुसरा वार केला.

दरम्यान संजनाचा आवाज आल्यामुळे तिचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर धावले. मात्र तोपर्यंत अभिषेक पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजनाला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोरेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक यास सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!