ज्ञाना शिवाय संस्कार नाही अन् संस्कराशिवाय शिक्षण नाही- विजय रापतवार
ज्ञाना शिवाय संस्कार नाही अन् संस्कराशिवाय शिक्षण नाही- विजय रापतवार
ज्ञानसंस्कार गुरुकुल येथे शिवजयंती व 10 वी निरोप समारंभ संपन्न
अंबाजोगाई: ज्ञानसंस्कार गुरुकुल अंबाजोगाई या ठिकाणी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार सर हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री.भागवतजी इंगळे सर, पंडित चव्हाण सर, ज्ञानसंस्कार गुरुकुलचे संचालक श्री.नामदेव मुंडे सर, सहकारी शिक्षक मनोज शेप सर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालक नामदेव मुंडे सर यांनी विद्यार्थी हेच दैवत असुन भविष्यात अनेक विद्यार्थी गुरुकूलचे नाव मोठे करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थी मनोगत दयानंद कटारे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण करुन केले. मान्यवरांचे स्वागत, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना विजय रापतवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की ज्ञानाशिवाय संस्कार नाही संस्काराशिवाय शिक्षण नाही आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही जर विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी ज्ञान संस्कार सारख्या गुरुकुलात प्रवेश घेऊन इथली शिस्त दिनाचार्य अभ्यास करण्याची पद्धत व सुसंस्कार घेतल्याशिवाय पुढे वाटचाल करता येणार नाही ज्ञान संस्कार गुरुकुल अंबाजोगाई मध्ये अल्पावधीतच खूप चांगल्या प्रकारचं प्रकल्प म्हणून नावावर उपस्थित आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला किंमत देऊन इथं आठ दिवसाला परीक्षा घेतल्या जातात त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो बेसिक पासून मुलांची तयारी केल्यामुळे विद्यार्थी लहानपणापासूनच स्पर्धात्मकरीत्या परिपूर्ण तयार होतात त्यासाठी ज्ञान संस्कार हे अंबाजोगाई मध्ये गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी पंडित चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी व यश मिळवावे असे सांगितले तर भागवत इंगळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरुवातीपासूनच आपल्या भवितव्याचा विचार करत व्यसनाधीनते पासून सावध राहा व स्वतःला आदर्श नागरिक म्हणून घडवण्याची संधी तुम्हाला ज्ञानसंस्कार गुरुकुलच्या माध्यमातून मिळाली आहे. मुंडे सर ज्ञानसंस्काराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्या उपक्रमांची सर्वत्र चर्चा होते कौतुक होतं आम्ही नेहमी पाहतो की ज्ञान संस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहे आपण त्याचे एक भाग आहात तुमच्या आयुष्यात घडवण्यासाठी जी मेहनत घेतात त्या मेहनतीला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी. आम्ही वेळोवेळी आपल्या सोबत आहोत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव मुंडे सर यांनी केले तर आभार शेप सर यांनी मानले.*
