मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर अपघातातून बालंबाल बचावले
मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर अपघातातून बालंबाल बचावले
शिवनेरी (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आसुन शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिगेट्सचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिवजयंती दिवशी बुधवारी शिवनेरी गडावर हेलिपॅड तयार केले होते. हे हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजते आहे. या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असे चौघेही होते. या हेलिकॉप्टर ला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती जे सुरक्षेकरीता बॅरिकेड्स उभारले होते. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेत स्थिरावले होते.
हेलिकॉप्टर लँडिंगचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मात्र पायलट ने सावधानता बाळगून पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचं पूर्व पश्चिम असं लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असे सुरक्षितरित्या लँडिंग केलं. हेलिकॉप्टर उतरल्यावर पायलटने हा प्रकार सबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स हटविण्यात आले.
या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी दुर्घटना होता होता ते बचावले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या बेजबाबदार नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस गेल्या आठ वर्षात पाच वेळा अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून बचावले आहेत. गडचिरोली येथे 2017 च्या दौऱ्यात असताना अशीच घटना घडली होती. त्यानंतर 2018 मध्ये भाईंदर, 2019 मध्ये अलिबाग – रायगड मध्ये लँडिंग करताना आणि 2023 मध्ये जामनेरला उड्डाणा आधीच पायलट दक्ष असल्याने दुर्घटना टळली होती. त्यानंतर आता 2025 किल्ले शिवनेरीवर लँडिंग करताना हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान घटना घडली.