छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य अंबाजोगाई शहरात दुर्गप्रेमी मित्र मंडळाच्या वृत्तीने शिवकालीन वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य अंबाजोगाई शहरात दुर्गप्रेमी मित्र मंडळाच्या वृत्तीने शिवकालीन वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य अंबाजोगाई शहरातील दुर्गप्रेमी मित्र मंडळाच्या आयोजित शिवकालीन वेशभूषा स्पर्धेस चिमुकल्या बाल कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिवकालीन स्मृती जागृत करण्याचे काम केले.
अंबाजोगाई शहरातील दुर्ग प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवकालीन वेशभुषा स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा वारसा घराघरात पाेहचवण्यासाठी व शिवजयंती साेहळा पारंपारिक पद्धतीने साजरा व्हावा. इतिहास व संस्कृतीचा अभ्यास व्हावा बालमनावर संस्कार हाेऊन इतिहास कळावा व ताे जपला जावा यासाठी गेल्या पाच वर्षापासुन प्रयत्न करण्यात येत असून प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी या स्पर्धा कै.बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे घेण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन अँड.श्री राजेंद्र धायगुडे, सामाजीक कार्यकर्ते श्री संजय गंभीरे, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर तसेच प्रा. साै लताताई पत्की हे मान्यवर उपस्थित हाेते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.दिलीपराव कुलकर्णी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक आनंतराव देशपांडे हाेते .वेशभुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणुन साै रेवती देव व श्री सुधीरराव धर्माधिकारी हाते. कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती पूजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात श्री.भागवत आचार्य यांनी शिवगीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत एकुन 35 स्पर्धकांनी सहभाग नाेंदवला हाेता. सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक कु.अवनी श्रीकांत पवार हीला प्राप्त झाले त्याचे स्वरूप २१००/- रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष, द्वितीय पारितोषिक सृष्टी सुर्यकांत देशपांडे हीला प्राप्त झाले. त्याचे स्वरूप १५००/- रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष, तृतिय पारितोषिक कु. श्रावणी महेश साबळे हीला प्राप्त झाले. त्याचे स्वरूप १०००/- रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष असे ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ पारितोषक पहिले सौ.राजकुमारी राजकुमार किर्दंत यांना प्राप्त झाले. त्याचे स्वरूप ५००/- रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष,असे होते. उत्तेजनार्थ दुसरे कु.सिध्दी शाम वारकरी हीला प्राप्त झाले. त्याचे स्वरूप ३००/- रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व वृक्ष असे ठेवण्यात आले होते.

सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे विजेत्या स्पर्धकांचे काैतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या़. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.बळीराम पूरी यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी दुर्गप्रेमी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला, आभार दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आरती सोनेसांगवीकर यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.
सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, दुर्गादास दामोशन, भास्कर देशपांडे, संजय देशपांडे, महेश राडकर
तोरंबेकर मॅडम, भागवत आचार्य
वैभव कुलकर्णी, बाबुळगावकर मॅडम आदींनी केले.
या कार्यक्रमासाठी ,ॲड. बळीराम पूरी, श्री.भागवत आचार्य, धनश्री आघाव, वैष्णवी आघाव,शिवम आघाव, गोविंद उंबरे, वैष्णवी राठोड, श्रीमती शिल्पा सेलुकर, श्री.मिलिंद कुलकर्णी,वैभव कुलकर्णी, सर्वजित कुलकर्णी,सौ. वैभवी पाटील, शुभम नरके, नितीन सिनगारे यांनी परिश्रम घेतले.
