ताज्या घडामोडी

आर सी एम एस प्रणालीत तीन महीन्या  पासून बिघाड अंबाजोगाई तालुक्यातील हजारो शिधापत्रिका धारकांची हेळसांड आ नमीताताई मुंदडा यांनी शासना कडे पाठपुरावा करण्याची मागणी 

आर सी एम एस प्रणालीत तीन महीन्या  पासून बिघाड अंबाजोगाई तालुक्यातील हजारो शिधापत्रिका धारकांची हेळसांड

आ नमीताताई मुंदडा यांनी शासना कडे पाठपुरावा करण्याची मागणी 

 
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ जवळपास तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. पोर्टलमध्ये तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेशन कार्ड व इतर कामांसाठी ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येत असल्याने अंबाजोगाई तालुक्यातील नागरिक हैराण आसून आ नमिताताई अक्षय मुंदडा यांनी या प्रकरणी  शासना कडे पाठपुरावा करून लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे.
    राज्यात सर्वच प्रकारची नोंदणी ही ऑनलाईन असल्याने वेबसाईटवर ताण येऊन वेबसाईट सतत बंद पडत आहे व याचा परिणाम शासकीय सेवा देणाऱ्या कामावर होत आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची बंद पडलेली
ही वेबसाईट त्यापैकी एक आहे. रेशनकार्डवर नाव वाढवणे किंवा कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, आधार संबंधित कामे, वैद्यकीय कामासाठीचे दाखले या विभागातून दिले जातात. तीन महिन्यापासून या वेबसाईटमध्ये अडथळा येत होता. कधी सुरु तर कधी बंद अशी अवस्था होती. दुसरीकडे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी अर्जदारांची संख्या वाढत आहे. मात्र वेबसाईट बंद असल्यामुळे ही कामे ठप्प आहेत. मागील 3 महिन्या पासून वेबसाईट पूर्ण बंद आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या साइट दुरुस्तीच्या कामामुळे पुरवठा विभागातील कामे खोळंबली आसून राज्यभरातच ही समस्या असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. साइट चालत नसल्याने पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक अंबाजोगाई तालुका पुरवठा विभागात हजेरी लावत आहेत. काम होत नसल्याने त्यांना रिकामेच परतावे लागते. काही जणांचे कार्यालय परिसरातच तासन्तास थांबूनही काम होत नाही. कामांचा निपटारा करताना पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. चूक वेबसाईटची पण दोषी पुरवठा विभाग ठरत आहे. शासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असून अन्न व नागरी पुरवठा विभागाने साइटच्या दुरुस्तीची कामे लवकर मार्गी लावून साइट पूर्ववत सुरू करून नागरिकांची हेळसांड थांबवावी या साठी
आ नमिता ताई अक्षय मुंदडा यांनी या प्रकरणी शासना कडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे.
बारा अंकी नंबरची अट शिथिल करण्याची गरज
    महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होतात. पांढरे रेशनकार्ड धारकांचाही यामध्ये आता समावेश आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत असून पुरवठा कार्यालयात गर्दी होत आहे. परंतु, गेल्या २२ दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामे होत नाहीत. १२ अंकी क्रमांक नोंद केल्याशिवाय रुग्णालयात अर्ज स्वीकारला जात नाही. परिणामी रुग्णावर उपचार करण्यात मर्यादा येतात. यातून मार्ग काढण्यासाठी रेशनकार्डचा पुरावा ग्राह्य मानून बारा अंकी क्रमांकाची अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!