ताज्या घडामोडी

अँपा डॉक्टर्स व्हॉलीबॉल चॅम्पियन चषक स्पर्धेत ‘अँपा स्मॅशर्स’ संघास विजेतेपद

अँपा डॉक्टर्स व्हॉलीबॉल चॅम्पियन चषक स्पर्धेत ‘अँपा स्मॅशर्स’ संघास विजेतेपद

कर्णधार डॉ राजेश इंगोले यांना सामनावीर तर डॉ संदीप जोगदंड मालिकावीर पुरस्काराने सन्मानित
====================

प्रतिनिधी, (अंबाजोगाई)

अंबाजोगाई मेडीकल प्रकटीशनर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच अंबाजोगाईतील सर्व डॉक्टर्स साठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन मानवलोक येथील व्हॉलीबॉल मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ कर्णधार असलेल्या डॉ राजेश इंगोले यांच्या अँपा स्मॅशर्स संघाने पहिले विजेतेपद पटकावले तर डॉ प्रदीप सोनवणे यांच्या लेजेन्ड्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात अँपा स्मॅशर्सचे कर्णधार डॉ राजेश इंगोले यांनी नेतजवळ अत्यंत उत्कृष्ट खेळ करत आपल्या संघाचा विजय सुकर केला. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्यांना अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर संपूर्ण स्पर्धेत संघासाठी सेन्टर खेळणाऱ्या डॉ संदीप जोगदंड यांना मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेच्या उपविजेत्या संघाचे कर्णधार डॉ प्रदीप सोनवणे यांनीही झुंजार खेळ करत आपल्या संघास विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे उदघाटन सकाळच्या सत्रात डॉ सुलभा खेडगिकर आणि डॉ मिसेस एस यु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी व मानवलोकचे सहकार्यवाहक समाजसेवक अनिकेत लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी बोलतांना डॉ सुलभा खेडगीकर यांनी जीवनात आरोग्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत.
डॉ सौ एस यु पाटील यांनी कला व क्रीडा कौशल्य जीवनात आनंद निर्माण करतात आणि अशी आनंदी माणसे समाजात वावरताना समाजातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ राजेश इंगोले आहेत असे सांगत डॉ इंगोले विविध व्यासपीठांवर, विविध गायन स्पर्धेत, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात, विविध खेळ प्रकारात सक्रिय सहभाग नोंदवतात. त्यामुळे त्यांची देहबोली आणि व्यक्तिमत्व इतरांना आवडत आणि त्यांच्या सोबत राहील की जीवनाचा इतर ताण आपोआप विसरला जातो असे सांगत आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धता आणण्यासाठी सर्वानी ह्या गोष्टीचे अनुकरण करावे असा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी अँपा संघटनेमार्फत अँपाच्या अध्यक्ष डॉ सुलभा पाटील ,खेळ सचिव डॉ बी डी माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धांचे कौतुक करत अंबाजोगाईत प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धा डॉक्टर्स साठी ठेवण्यात आल्या याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सर्व पॅथीचे डॉक्टर्स एकत्र येऊन विविध क्रीडा कौशल्यांमध्ये आपले खेळगुण दाखवून समाजानेही आरोग्यप्रति सजग राहावे हा संदेश आपल्या अनुकरणाने देतात हे अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन करत विजेत्या संघाचे कर्णधार डॉ राजेश इंगोले ,मालिकावीर डॉ संदीप जोगदंड आणि उपविजेत्या संघाचे कर्णधार डॉ प्रदीप सोनवणे यांचे कौतुक केले.
मानवलोकचे सहकार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सर्व डॉक्टर्स आपल्या सेवा कर्तव्यात इतके व्यस्त असतात की रुग्णसेवा करताना आपली तहानभूक,आपलं वैयक्तिक कौटुंबिक आयुष्य, आपली शारीरिक तंदुरुस्ती या कडे सपशेल दुर्लक्ष करतात याचे परिणाम म्हणून त्यांना रक्तदाब, डायबेटीस अशा व्याधी इतरांच्या मानाने लवकर सुरू होतात. हे टाळण्यासाठी सर्व डॉक्टर्सनी आपली शरीरसंपदा व्यवस्थित ठेवण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे असे सांगितले.
विजेत्या अँपा स्मॅशर्स संघाचे कर्णधार डॉ राजेश इंगोले यांनी अँपा संघटनेच्या अध्यक्षा डॉ सुलभा पाटील, उपाध्यक्ष डॉ सुनील नांदलगावकर,सचिव डॉ ऋषिकेश घुले, क्रीडा सचिव डॉ बी डी माळवे, सांस्कृतीक सचिव डॉ संदीप जैन, डॉ विवेक मुळे, डॉ मनीषा पवार यांचे या अभूतपूर्व स्पर्धा सर्व डॉक्टर्सना एकजीव करणाऱ्या ठरल्या आहेत, खेळात खेळणारे खेळाडूमध्ये एकमेकाप्रति सहकार्य आणि प्रेमाची भावना वृद्धिंगत झाली आहे. तसेच या स्पर्धांमुळे एक वेगळ्या प्रकारच्या उत्साहाचा आणि ऊर्जेचा अनुभव सर्व पॅथीच्या डॉक्टर्स मध्ये संचार झाला आहे असे म्हणत या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन केले.
अँपा संघटनेच्या अध्यक्ष डॉ सुलभा पाटील यांनी खेळात सहभागी सर्व डॉक्टर्सचे, विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत यापुढेही संघटनेतर्फे येणाऱ्या काळात डॉक्टर्स साठी विविध सांस्कृतिक व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सूतोवाच केले.
अँपा संघटनेचे क्रीडा सचिव डॉ बलभीम माळवे यांनी प्रास्तविक करतांना या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व डॉक्टर्स खेळाडूंनी सहभाग नोंदवत या स्पर्धा यशस्वी केल्या याबद्दल कौतुक करत यापुढेही अशाच दर्जेदार स्पर्धा घेणार असे आश्वासन दिले.
सामन्यांसाठी पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू संतोष कदम तर स्कोरर म्हणून डॉ ऋषिकेश घुले यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनील नांदलगावकर तर आभार प्रदर्शन डॉ संदीप जैन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!