देवदर्शनावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू तिघे जन गंभीर जखमी
देवदर्शनावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू तिघे जन गंभीर जखमी
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात अपघातांची माहिती सुरुच आसून शुक्रवारी केजजवळ दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन दोन डॉक्टर चा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मानवत तालुक्यातील वझुर गावातील निवृत्त प्रा.माणिक चव्हाण हे सध्या पालम येथे राहतात. त्यांचा मुलगा डॉ. मंथन चव्हाण हे सोनपेठ येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. 2 जानेवारीला डॉ. मंथन याचे सातोना येथील मुलीशी विवाह पार पडला. हे नवदांम्पत्य यात्रा म्हणून देवदर्शनासाठी कानसूर येथील त्यांची बहीण डॉ.मृणाली शिंदे व वझुर येथील त्यांचा चुलत भाऊ डॉ.ओम चव्हाण असे चारजण कारने (एम.एच.22, ए.एम.4571) जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासात सोनपेठकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अहमदपूर ते अहमदनगर महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यानच्या मुळकवाडी येथील पुलाला कार धडकल्याने झाला. या अपघातात डॉ.ओम चव्हाण व डॉ.मृणाली शिंदे हे दोघे डॉक्टर बहीण – भाऊ जागीच ठार झाले. तर कारमधील नवदांम्पत्यातील डॉ.मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मानवत तालुक्यातील वझुर व पाथरी तालुक्यातील कानसुर या दोन गावावर शोककळा पसरली. डॉ.ओम चव्हाण यांच्या पार्थिवावर वझुर येथे तर डॉ.मृणाली शिंदे यांच्यावर कानसूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अपघातांची मालिकी सुरुच आहे. शुक्रवारी केजजवळ दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच हा अपघात झाल्याने चकाचक होणारे रस्ते या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे बोलल्या जात आहे.
