‘निर्भय’ बीडसाठी पोलिस अधीक्षक काँवत यांचा मोठा निर्णय; ‘QR Code’ ही नवीन यंत्रणा ठरणार गुन्हेगारांसाठी ‘कर्दनकाळ, राजकीय बुरखा पांघरलेल्या कार्यकर्त्यांचे पितळ केलं उघड
‘निर्भय’ बीडसाठी पोलिस अधीक्षक काँवत यांचा मोठा निर्णय; ‘QR Code’ ही नवीन यंत्रणा ठरणार गुन्हेगारांसाठी ‘कर्दनकाळ, राजकीय बुरखा पांघरलेल्या कार्यकर्त्यांचे पितळ केलं उघड
बीड (प्रतिनिधी)
बीड (Beed) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीडचे पोलीस (Police) अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी शुक्रवारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून चार हात लांब राहण्याची तंबी देत ‘नि्र्भय’ बीड जील्हा वासीया साठी नवीन यंत्रणा अंमलात आणली आहे. जी जिल्ह्यातील गुन्हेगारांसाठी ‘कर्दनकाळ’ठरण्याची शक्यता आसून राजकीय बुरखा पांघरलेल्या कार्यकर्त्यांचे पितळ या माध्यमातून उघड झाले आहे.
वाढत्या गुन्हेगारी घटनांनी हादरत असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांमधील आणि पोलिस यंत्रणेतील अंतर कमी व्हावं, या उद्देशानं पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक QR Code यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेद्वारे नागरिकांना थेट पोलिसांत थेट तक्रार देखील करता येणार आहे.
बीडचे अधिक्षक नवनीत काँवत यांनी सुरु केलेल्या क्यू. आर. कोड च्या यंत्रणेद्वारे पोलीस ठाण्यातील विविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचणार आहे.तसेच नागरिकांसाठी हा QR Code पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यासह पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात लावला जाणार आहे.नागरिकांना त्यांच्या मोबाईलद्वारे हा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेली तक्रार किंवा अडचणी नोंदवता येणार आहे.
या कोडद्वारे एखाद्या नागरिकाला अवैध धंदे किंवा इतर गुन्ह्यांविषयी किंवा एखाद्या गुन्हेगारांविषयीची महत्वपूर्ण माहिती देता येणार आहे. संबंधित व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहिती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहिती देऊ शकतात. अशा व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत स्वत:या क्यूआर कोडमार्फत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी,प्रतिक्रिया, सूचना यांवर लक्ष असणार आहेत. या यंत्रणेद्वारे नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. एखाद्या तक्रारदार पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधानी नसेल अधीक्षक कार्यालयाकडून 24 तासांच्या आत त्या समस्येचा पाठपुरावा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.पोलिसांच्या कामगिरीचे गुणांकन देखील याच फॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे
