अंबाजोगाई बसस्थानकातून आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला
अंबाजोगाई बसस्थानकातून आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला
अंबाजोगाई : (प्रतिनिधी)
लग्न समारंभ आटोपून गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील बसस्थानकात आज रविवारी (दि.०२) सायंकाळी ७ वाजता घडली.
सोनपेठ येथील गुलाबशहा राणी गयासोद्दीन मन्यार या पतीसह परंडा येथे एका लग्न समारंभाला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या पंढरपूर-अंबाजोगाई बसने अंबाजोगाईतील नगरपालिकेच्या उद्यानासमोरील तात्पुरत्या बसस्थानकात आल्या. त्यानंतर माजलगाव गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. या पर्समध्ये आठ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने खाली उतरून परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा पसार झाला होता. यानंतर त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आसल्याचे वृत्त आहे.
