चंदन सावरगाव नजीक दोन कारची समोरासमोर धडक; तिघे ठार, एक गंभीर
चंदन सावरगाव नजीक दोन कारची समोरासमोर धडक; तिघे ठार, एक गंभीर
केजः (प्रतिनिधी)
अंबाजोगाई- केज रोड वरील चंदन सावरगाव नजिक दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात अमित दिलीप राव कोमटवार तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत यात एकाची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सुचनेनुसार बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले असून अपघातातील मृतांची व जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र अपघातात अमित दिलीप राव कोमट वार, गणपत नारायण गोरे सह तिघांचा मृत्यू तर विनोद शिंदे, विष्णू धोत्रे हे जखमी झाले आहेत एकावर स्वाराती मधे तर एकावर लातूर येथे उपचार सुरू आहेत
