ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत भेळ पाणीपुरी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश तीन आरोपीस अटक 

अंबाजोगाईत भेळ पाणीपुरी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश तीन आरोपीस अटक 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    अंबाजोगाई शहरातील भेळ पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या कडे येऊन कोयत्या सारख्या धारधार शस्त्राचा धाक दाखवत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्या चार छडा लावण्यात अंबाजोगाई पोलिसांना यश आले असून भेळ मालकाच्या तक्रारी वरून पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर तीन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
    बीड जिल्हयातील सर्वाजनिक सुव्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था अबाध्दीत ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा संभाळल्यापासुन शर्तीचे प्रयत्न चालविले आसून बीड जिल्हयातील गुंडगीरीचे व गुन्हेगारीचे समुळ उच्चटन करण्याच्या उदात्त दृष्टीकोण डोळयासमोर ठेवुन श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, श्री अनिल चोरमले उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर यांनी अंबाजोगाईतील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी या करीता शर्तीचे प्रयत्न चालविले आसून दिनांक २९/०१/२०२५ रोजी रात्री ९ वाजणेच्या सुमारास अनोळखी तीन इसम स्कुटीवर आले व आम्हाला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्याना पैसे देणार नाहीत, तुम्ही येथून चालते व्हा असे म्हणाले व त्यांनी शिवीगाळ करून गचांडीला धरुन लाथाबुक्याने व चापटाने मारहान केली. व भेळ च्या गाड्यावर बुक्की मारून काचा फोडून नुकसान केले व गल्यातील जमा झालले १२०० रुपये मारहान करून जबरदस्तीने घेवुन गेले. त्यांच्या नावाची माहीती घेतलीअसता त्याचे नावे १) विष्णु रामेश्वर पतंगे रा. गिता रोड अंबाजोगाई २) अनिकेत महादेव मिसाळ रा. गिता रोड अंबाजोगाई ३) अभय शिंदे रा. भगवान बाबा चौक अंबाजोगाई असे असून या सर्व जणांच्या विरुद्ध भेळ गाड्याचे मालक प्रकाश उदयलाल प्रजापती वय ३५ वर्षे यांच्या फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गु र न 51/2025 कलम 309 (6),352,351(2), 351(3), 324(4),324(5),3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाच्या तपासा साठी मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्हि.यु. घोळवे, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोह/३४९ इंगळे, पोह/१४८५ वडकर, पोह/१४८४ धाईजे या पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर च्या दोन तपास पथकांनी यातील आरोपीस तात्काळ अटक केली असुन त्यांना मा. न्यायालया समोर हजर केले असता आरोपीस मा. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे.

वेळीच पायबंद न घातल्यास शहरात कोयता गँग तयार होतील

अंबाजोगाई शहरातील वाढती गुंडगिरी पाहता या टोळक्यावर वेळीच पायबंद घालन्याची आवश्यकता असून ही गुंडगिरी अशीच चालू राहिली तर भविष्यात अंबाजोगाई शहरात पुणे मुंबई सारख्या कोयता गँग तयार झाल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!